मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव, दि. 26 – मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेमधील पहिला टप्पा 31 जुलै रोजी संपत असल्याने थकीत मुद्रांक शुल्क व शास्ती अथवा थकित शास्ती या संबंधित पक्षकारांनी योजनेचा लाभ घेण्याकरिता तत्काळ जिल्ह्याचे सहजिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी केले.
योजनेचा लाभ घेतल्यास सदर सवलतीच्या पहिल्या टप्प्यात थकीत शास्तीवर 90% सवलतीचा लाभ मिळेल. अन्यथा सदर पक्षकारांना दुसऱ्या टप्प्यातील शर्तीप्रमाणे थकित शास्तीवर 50 % दंड भरावा लागेल.
योजनेबाबत अधिक माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. याबाबत कोणतीही अडचण असल्यास कॉल सेंटर 88880 07777, complaint@igrmaharashtra.gov.in यावर संपर्क साधावा.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



