आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्रराजकीय
Trending

बहिणीला साथ द्यायला प्रचाराच्या मैदानात उतरला आमदार भाऊ

पचोरा दि.23 – हनुमान जयंतीच्या मुहूर्त साधत प्रभू राम चरणी नतमस्तक होत पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी समस्त शिवसैनिक व भाजप पदाधिकारी यांचे सोबत महाआरती करून जळगाव लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार स्मीताताई वाघ यांच्या प्रचारची सुरवात करून विजयाची उमंग समस्त महायुती मध्ये निर्माण केली. आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक जळगाव लोकसभा मतदार संघ विजयी करून दाखवतील असा आशावाद आज बघावयास मिळाला.

उपस्थितांन मध्ये महायुतीच्या उमेदवारास भरघोस मतांनी निवडून देऊन मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारताच्या उज्वल भविष्यासाठी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान करून अबकी बार चारसो पार हा 2024 लोकसभा निवणुकीसंदर्भात दिलेला नारा पूर्णत्वास नेण्यासाठी सबंध महायुतीचे घटकपक्षा सहित सर्व कार्यकर्त्यांनी चंग बांधला असून तो यशस्वी करून दाखवणार असल्याचे या वेळी बघावयास मिळाले.

यावेळी उपजिल्हा प्रमुख किशोर बारावकर,बाजार समितीचे सभापती गणेश पाटील,तालुका प्रमुख सुनील पाटील,भाजपचे कोष्याध्यक्ष कांतीलाल जैन,रमेश वाणी माजी नगराध्यक्ष संजय गोहिल,युवा नेता सुमीत पाटील,युवा सेना जिल्हा प्रमुख जितेंद्र जैन,तालुका प्रमुख अनिल पाटील, भाजपाचे व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश वाणी, निवडणूक प्रबंधन समिती सदस्य सुनिल पाटील,शहराध्यक्ष दिपक माने, युवा मोर्चाचे समाधान मुळे, विधानसभा विस्तारक गोविंद शेलार,माजी शहराध्यक्ष रवी पाटील,माजी नगराध्यक्ष शरद पाटे,दत्ता जडे,नगरसेवक गंगाराम पाटील, राम केसवानी, बंडू चौधरी,सुधीर शेलार,शेतकरी संघाचे उपसभापती नरेंद्र पाटील,शहर प्रमुख सुमीत सावंत,भोला पाटील,हेमंत चव्हाण,किशोर भोई,सुरज शिंदे, छोटू चौधरी,एकनाथ पाटील,सनी शिरसाट यांचेसह महायुतीतील भाजपा, शिवसेना, मनसे आणि मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची तसेच राम व हनुमान भक्तांची मोठ्या संख्येनी उपस्थिती होती

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!