आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

माणुसकी समुहाने व मनोविकृतीशास्त्र विभाग घाटि यांनी दिला मनोरुग्ण महिलेला न्याय.

घाटी रुग्णालयात प्रथोमोपचार करुन दैवत आश्रम येथे केले दाखल.

सदरील मनोरुग्ण महिला शासकीय रुग्णालय घाटी औरंगाबाद,घाटि परीसरात गेल्या दोन-तीन महिन्यापासून ओ.पी.डी विभागामध्ये जोरजोरात आरोळ्या मारणे अश्लील शिवीगाळ करणे,नेहमी बडबडत असणे,मला कुठेतरी राहण्याची व्यवस्था करा असे नेहमी सांगत राहणे,लोकांना दगड मारणे, वार्ड क्रमांक १४१ येथे येऊन डॉक्टरांशी हूज्जत घालने असा प्रकार ही महिला करीत होती.या बाबतची माहिती शासकीय मेडिकल कॉलेज घाटी औरंगाबाद समाजसेवा अधीक्षक सेक्रेटरी विभाग नरेंद्र भालेराव यांनी माणुसकी समूहाचे समाजसेवक सुमित पंडित यांना सदरील मनोरुग्ण महिलेची माहिती दिली. तात्काळ घाटी रुग्णालयात जाऊन समाजसेवक सुमित पंडित यांनी शोधमोहीम चालु केली असता,एक महिला घाटि परिसरात रस्त्यावर गोधळ घालतांना दिसली त्यांची चौकशी केली असता तीने सांगितले कि माझे पती वारल्यानंतर माझे या जगात कोन्हिच राहले नाही एक मुलगा एक लहान मुलगी माझ्या मुलीला महिला सुधारगृहात घेवुन गेले आहे माझ्या डोक्यात फरक पडल्याने मी दोन वेळचे जेवन मीळते म्हणून मी घाटि रुग्णालयात च राहते रात्रीचे लोक खूप त्रास देतात मला कुठतरी राहायची सोय करा असे तीने सांगितले.ती शासकीय रुग्णालयात मोठा धिगांना घालत होती.त्यांना मनोविकार तज्ज्ञांनी प्रथोमोपचार करीत इंजेक्शन,
औषधी देऊन उपचार केले आणि नंतर या मनोरुग्ण महिलेला खाजगी वाहनांनी दैवत वृध्दाश्रमात उमा तुपे यांच्या येथे अन्न वस्त्र निवारा याकरीता दाखल करन्यात आले.
एवढे सगळे आयकुन मला एकच प्रश्न सारखा भीडसवत होता.
आपल्या घरातील स्त्री बाहेर गेली आणि घरी परत यायला तिला उशिर झाला की आपला जीव कासाविस होतो.रात्री अपरात्री काही झालं तर ? ती जेव्हा घरी सुखरूप आल्या नंतर आपली काळजी संपते.घरातल्या चार भिंतींच्या मर्यादेत ती सुरक्षित असते.पण अशाच असुरक्षित व धोक्याच्या ठिकाणी कित्येक स्त्रिया रात्री भटकत असतात;ती कुणाची तरी आई, मुलगी, पत्नी,किंवा बहीण असेल.पण त्यांची वाट पाहणारं असं कुणीच नाही.अशा अनेक महिला ज्यांना त्यांच्या जवळच्या आपल्या लोकांनीच व समाजाने देखील सोडून दिलं आहे.कारण त्या आजारी आहेत, मनोविकृत आहेत.समाजसेवक सुमित पंडित माणुसकी समूहाच्या टीमने मदत कार्य केले.या कार्यासाठी मनोविकृतीशास्त्र विभागाचे डॉ प्रसाद देशपांडे,डॉ प्रदीप देशमुख डॉ रुपेश बनसोड,नरेंद्र भालेराव समाजसेवा अधीक्षक,डॉ पंकज पवार,डॉ अनिक पाल,नेल्सन काळे आदिंनी मदतकार्य केले.


आतापर्यंत माणुसकी टिम ने कितीतरी मनोरुग्ण महिलेला न्याय दिला आहे.

माणुसकी समूह आता सामाजिक दायित्व साठी आणि सामाजिक कर्तव्य स्वीकारण्यासाठी एक समानार्थी शब्द बनलेला आहे.ती भगिनी मानसिक आजाराने पीडित आहेत.हा तीचा गुन्हा आहे का ? समाजाने वाळीत टाकलेल्या ह्या महिलांवर शारीरिक अत्याचार होत नसतील का ? अमानुष लोकांच्या वासनेच्या शिकार झालेल्या ह्या महिलांपासून जन्माला आलेल्या अनाथ मुलांचा भार कोणी सांभाळावा? हे प्रश्न कायम समाजाला विचारल्या जात आहे,आणि कोणीही कायमस्वरूपी ह्यावर उत्तर द्यायला तयार नाही.मग यांच्यासाठी एक मायेचं आपुलकीचं घर आहे का ? यांना असच उकिरड्यावर ठेवायचे काय ? समाजाच दायित्व काहीच नाही का ? हे मनोरुग्ण देखील आधी सामान्य जीवन जगत होते. जीवनात संकट सांगुन येत नसतात.पण ज्या सामाजिक संस्था अशा मनोरुग्णांसाठी काम करतात त्यांना मदत करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी उद्योजकांनी समाजबांधवांनी समोर येणे अत्यंत गरजेचे ठरते. या मदतीतून आपण या मनोरुग्णांचे जीवन अधिक सुसह्य करू शकतो.आणि समाजाची खरी मानसिक विकृती नष्ट होईल.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!