मनसे जिल्हा अध्यक्ष अनिल वाघ यांचे आमदारांना साकडे तर वैशाली ताईंना मोफत शिक्षण देण्यासाठी प्रश्न!

पाचोरा – मनसे जिल्हा अध्यक्ष यांनी दिं 1 जुलै रोजी पाचोरा येथे पत्रकार परिषद घेऊन आमदार किशोर आप्पा पाटील यांचे कडे काही मागण्या केल्यात .
सन्माननीय आमदार यांच्याकडे भडगाव पाचोरा मतदारसंघातील काही कामांची मागणी करीत आहोत (१) बलून बंधायासाठी भडगाव पाचोरा मतदार संघातील मंजूर करण्यात आलेली गावे भडगाव पांढरत तसेच पाचोरा तालुक्यातील माहिजि व परदा भडगाव येथे आमदार साहेब यांच्या प्रजातून 133 कोटी रुपये मंजूर झाले असून त्याच धर्तीवर परत पाचोरा तालुक्यातील माथ जी व परदादे येथे केटीवेअर मंजूर करावे (२) आदिवासी बांधवासाठी आदिवासी प्रकल्प कार्यालय भडगाव येथे या अधिवेशनात तात्काळ मंजूर करून घ्यावी (३) भडगाव शहरातील 4000 भोगवटा धारक तसेच पाचोरा शहरातील भोगवटाधारकांची नावे सिटीसर्वे ला नावे लावण्याचे आदेश सन्माननीय नगर विकास मंत्री यांच्याकडून आदेश प्राप्त करून घ्यावे (४) मतदारसंघात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून इच्छा नसताना देखील या मतदार संघातील सुशिक्षित तरुण हा अवैध धंद्यांकडे ओढला जात. आहे म्हणून आपण दिलेल्या व करीत असलेल्या पर्वाच्या माध्यमातून नगरदेवळा स्टेशन येथे मंजूर झालेले एमआयडीसीची प्रतीक्षा या अधिवेशनात संपवावी सध्या भडगाव पाचोरा मतदारसंघात अनेक शासकीय भूखंड विक्री संदर्भात सन्माननीय आमदार व भाजपा युवा नेते यांच्यामध्ये आरोग्य गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहेत या संदर्भात आपल्याकडे पुरावे असल्याचेही दोघांकडून सांगण्यात येते तथा पत्रकार परिषदही घेतल्या जातात परंतु कालांतराने या विषयावरती पांघरून घालण्यात येते व सर्वांना त्याचा विसर पडतो व त्या पुराव्याचे झाले काय हा प्रश्न तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाला पडतो म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पत्रकार परिषदेद्वारे मागणी करीत आहे. की नगरपरिषद अंतर्गत असलेल्या आतापर्यंतच्या झालेल्या शासकीय भूखंडाच्या खरेदी विक्री संदर्भात तसेच पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या मालकीच्या भूखंड तसेच गाळे विक्री प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची एका निवृत न्यायाधीशामार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी शासनाकडे आम्ही करीत आहोत जेणेकरून झालेल्या आरोपामध्ये किती सत्य आहे ते जनतेसमोर येऊन दूध का दूध व पाणी का पाणी होण्यास मदत होईल व दोषींवरती कार्यवाही होईल
शासनाने सदर मागणी कडे दुर्लक्ष केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जन आंदोलन उभे करून या संदर्भात माननीय न्यायालयाकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना न्यायाची मागणी करेल….
दिनांक 15 जून 2024 रोजी माननीय आमदार यांनी पत्रकार परिषद घेत दोन शालेय शिक्षण संस्थेवर विविध आरोप केले अमोल शिंदे व आमदार साहेब यांच्यातील आरोप प्रती आरोप सध्या सुरू आहेत असे असताना वैशालीताई सूर्यवंशी यांच्या निर्मल इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल वर केले गेलेले आरोप निश्चितपणे गंभीर आहेत मोठ्या प्रमाणात शैक्षणिक फी आकारले जाणे बूट कपडे पुस्तके शैक्षणिक साहित्य यात शैक्षणिक संस्थेचे कमिशन असणे हे निश्चितपणे शरमेची बाब असून या माध्यमातून पालकांची पिळवणूक व फसवणूक संस्थांमार्फत केली जात असेल तर स्वतःला वडिलांच्या सामाजिक कार्याचा वारसा चालवण्यासाठी आपण राजकारणात आलो आहोत हे सांगण्याचा अधिकार ताईंना आहे का जर यांना सामाजिक वारसा चालवायचा असेल तर त्यांनी विद्यासारखे विषयात या पद्धतीची फि आकारणे कमिशन खाणे कितपत योग्य आहे सामाजिक भावनेतून आपल्या मतदारसंघातील गरीब होतकरू हुशार विद्यार्थ्यांना जर यांनी आपल्या संस्थेत मोफत शिक्षण दिले तर कैलासवासी तात्यांना श्रद्धांजली ठरणार नाही का.. ताई खरंच आपल्या वडिलांचा सामाजिक वारसा चालवण्यासाठी आपल्या संस्थेत मार्फत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देतील का आणि सर्वात महत्त्वाचं आमदार हे मतदारसंघाचे पालक असतात जर तुमच्याकडे या संस्था संदर्भात पुरावे आहेत तर आपण गप्प का पालकांची होणारी पिळवणूक व फसवणूक थांबवण्याची जबाबदारी आपली नाही का म्हणून मी आमदार यांना आवाहन करतो की त्यांनी होऊ घातलेल्या अधिवेशनात अशा संस्थांवर कार्यवाहीची मागणी करावी जेणेकरून पालकांची होणारी पिळवणूक व फसवणूक थांबवता येईल.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



