
पाचोरा – पाचोरा भडगाव मतदार संघातील मात्तबर वाघ घराण्यातील राजकीय सर्वेसर्वा पाचोरा भडगाव तालुक्यावर अधिराज्य गाजवलेले अनेक राजकीय ,सामाजिक क्षेत्रात, चळवळीत काम केलेले शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले असे वाघ घराण्यातील माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी अखेर जय श्रीराम चा नारा लावत भाजपा या राष्ट्रीय पक्षांमध्ये प्रवेश करण्याने भविष्यातील राजकारणात खूप मोठे फेरबदल होणार आहेत. विधानसभेवेळी जरी काही राजकीय गणिते अनाकलनीय झालेली असतील तरी मात्र आज त्या सायलेन्ट मोमेंटचा पूर्णविराम सापडला की काय अशी चर्चा नक्कीच करायला हरकत नाही ?
एका राजकीय घराण्याचे वारसदार व परिपक्व राजकारणी मतांची मोठी बेरीज असलेले राजकीय घराणं शैक्षणिक क्षेत्रातील त्यांची वाटचाल अशा सर्वच बाबी पाहिल्या तर ते ज्या पक्षात जातात तो पक्ष त्या ठिकाणी नक्कीच प्लस मध्ये येतो किंबहुना अपेक्षित राजकीय गणीतांची बेरीज सदर पक्षांना अपेक्षित असते ती मिळेल यात काही शंका नाही. अनेक वेळेस काळाप्रमाणे चालणे हे राजकारणातले सत्य असले तरी राजकीय वाटचाल करत असताना आपल्या कार्यकर्त्यांना, मतदारांना व सर्व सामाजिक घटकांना सोबत घेऊन चालताना ज्या काही गोळाबेरीज करायच्या असतात वा काही वजाबाकी करावयाच्या असतात ते गुणधर्म एखाद्या नेत्याच्या अंगी असायला हवे त्याच प्रमाणे मा.आ.वाघ यांची राजकिय वाटचाल बघता ते पुढील काळात राजकीय पटलावर नक्कीच आपल्या राजकीय अनुभवाच्या जोरावर एक आगळा वेगळा ठसा उमटवतील हे निर्विवाद सत्य नाकारता येणार नाही.
ज्याप्रमाणे पक्ष वाढीसाठी एक प्रचंड जनसमुदाय जोडणारा नेता हवा असतो तसे नेतृत्व नक्कीच माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या भाजप प्रवेशाने पाचोरा भडगाव तालुक्याला मिळणार असल्याने येथील स्थानिक कार्यकर्ते असतील अथवा संबंधित विचारधारेशी समरूप असलेले लोक नक्कीच या प्रवेशाने आनंदीत झाले असतील शिवाय अनुभवी नेतृत्वाचा पुरेपूर फायदा घेत भाजपा पाचोरा भडगाव तालुक्यात नक्कीच आपली राजकीय ताकद वाढविल्या शिवाय राहणार नाही या बाबतही आज नागरिकांमधून बोलले जात आहे. तूर्तास आता पक्ष प्रवेश होऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा .
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



