
एसपी श्रीकांत ढिवरे यांच्या आदेशाने 4 तासांत शहरभर धडक कारवाई; नागरिकांमधून समाधान
पाचोरा : दिनांक 24 एप्रिल रोजी , “सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांची खैर नाही” असा स्पष्ट संदेश देत पाचोरा पोलिसांनी सायंकाळी शहरात धडक कारवाई केली. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत ढिवरे यांच्या आदेशाने सायंकाळी 6 ते रात्री 10 या चार तासांत राबवलेल्या विशेष मोहिमेत शहर व परिसरातील 25 टवाळखोरांना उघड्यावर दारू पिताना रंगेहाथ पकडून पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने भास्कर नगर, भवानी नगर, मानसिंगा नगर, बाहेरपुरा, त्र्यंबक नगर, वरखेडी नाका, भिमनगर, कृष्णपुरी, प्रेमनगर, संभाजी नगर, बाहेरपुरा, आठवडे बाजार, जयसिन कॉलनी, वाल्मीक नगर तसेच वडगाव टेक, वेरुळी, गोराडखेडा, शिंदाड, अंतुर्ली आदी गावांमधून कारवाई केली.
पकडलेले 25 जण: दिपक देसले (52), प्रकाश शिंदे (42), अमोल जाधव (37), रमेश चव्हाण (61), किरण बागुल (21), वाल्मीक माळी (40), रमेश पाटील (30), आकाश पवार (28), अमोल पाटील (32), गौरव सोनवणे (28), चेतन मोरे (29), गुडडु कौतीक (50), किरण पाटील (54), प्रशांत पाटील (40), तुकाराम पाटील (42), मुनाफ पिंजारी (29), नाना पाटील (45), गौतम वावड (46), सचिन शिंगाडे (35), प्रशांत जाधव (44), प्रविण सोनवणे (27), गणेश कोळी (35), साहेबराव पाटील (60), नानासाहेब मोरे (70) व दिपक किर (48) यांचा समावेश आहे.
सर्व आरोपींवर महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे व धिंगाणा घालणे यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत ढिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. राहुलकुमार पवार व पाचोरा पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात टवाळखोरांचे धाबे दणाणले असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
एकाच दिवशी 25 जणांवर कारवाई
पाचोरा शहराच्या इतिहासात एकाच दिवशी उघड्यावर दारू पिणाऱ्या 25 जणांवर कारवाईची ही पहिलीच वेळ. 21 ते 70 वयोगटातील आरोपींचा समावेश.
पोलिसांचे आवाहन: सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊ नये, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल. नागरिकांनी असे प्रकार दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



