पाचोरा येथे बाल संस्कार शिबिर उत्साहात संपन्न, मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

पाचोरा – शहरात गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेले आध्यात्मिक बालसंस्कार शिबिराची दिनांक 14 मे 2026 रोजी मान्यवर संत साधू मंडळींच्या उपस्थितीमध्ये सांगता करण्यात आली

गेल्या दहा दिवसापासून शिबिरामध्ये जवळजवळ 200 पेक्षा अधिक मुलांनी सहभाग नोंदविला व सहभाग नोंदवून दहा दिवस शिबिरामध्ये सकाळी 5 वाजेपासून दिवसाला सुरुवात व्हायची सकाळी योगासन प्राणायाम नैमित्तिक श्लोक मंत्रपुष्पांजली हनुमान चालीसा विविध विषयावरील मान्यवर वक्त्यांची व्याख्याने या पद्धतीने दिवसभर कार्यक्रम करून संध्याकाळी हरिपाठ व रात्री महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने देखील झालेत
गेल्या सहा वर्षापासून लक्ष्मी माता वारकरी शिक्षण सेवाभावी मंडळ या बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था ही चालवली जात असून या संस्थेच्या माध्यमातून वर्षभरात विविध उपक्रम घेण्यात येतात वर्षभर संस्थेमध्ये जवळजवळ निवासी 70 मुले आणि मुली आहेत त्याच सोबत जे मुले अथवा मुली वर्षभर राहत नाहीत त्यांच्यासाठी ते व्यसनापासून मोबाईल पासून दूर राहून आपला आध्यात्मिक व सर्वांगीण विकास व्हावा यासाठी संस्थेचे अध्यक्ष सुनीताताई पाटील व योगेश महाराज पाटील हे दरवर्षी भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये बालसंस्कार शिबिर घेत असतात
सदर शिबिर हे पूर्णपणे मोफत होते आणि त्याचमुळे परिसरातील दानशूर दात्यांनी मुलांना सकाळी नाष्टा दुपारचे भोजन रात्रीचे भोजन व तसेच दुपारून थंड पेय अशा सर्वच व्यवस्था दानशूरदात्यांच्या माध्यमातून झाल्या शिबिराची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली काल्याच्या कीर्तनाला कीर्तनकार रविंद्र महाराज तारखेडेकर तसेच तालुक्याचे तहसीलदार आदरणीय विजयजी बनसोडे तसेच गावातील दानशूर व्यक्तिमत्व रमेश जी मोर पाचोरा पोलीस स्टेशनचे पीएसआय योगेश गणगे साहेब तसेच मोरे साहेब व परिसरातील राजकीय सामाजिक अध्यात्मिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांची मनोगते झाली विद्यार्थ्यांनी दहा दिवस जे शिकले आहेत त्याची प्रात्यक्षिके दाखवलीत त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देखील वाटप करण्यात आले व प्रमाणपत्रासोबतच लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेकडून संस्थेने निर्माण केलेली पहिलीच पुस्तिका व सोबत एक भेटवस्तू सुद्धा मुलांसोबत देण्यात आली
मुलांना निरोप देताना संस्थेच्या अध्यक्षा अनाथांची माय सुनीताताई पाटील व योगेश महाराज दोघेही गहिवरले व सर्वात मुलांच्या डोळ्यात अश्रू आलेत त्याप्रसंगी सर्व मुलांनी प्रतिज्ञा केली की आम्ही आयुष्यभर निर्व्यसनी राहून आई-वडिलांची व देशाची सेवा करण्यासाठी तत्पर राहू
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



