पँथर्स आर्मीच्या पाचोरा अध्यक्ष पदी पँथर गौतम सोनवणे यांची नियुक्ती.
जळगाव:- जिल्ह्य़ातील पाचोरा येथील PBC मातृभूमि या चॅनेल चे धडाडीचे पत्रकार गौतम सोनवणे यांची पाचोरा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे
ही नियुक्ती सर्वानुमते पँथर्स आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर खिल्लारे यांच्या हस्ते करण्यात आली आहे,गौतम सोनवणे-पाचोरा यांनी पत्रकारिता करित असतांना पाचोरा शहरातील व ग्रामीण भागातील अनेक गोरगरीब वंचित शोषित नागरिकांना त्यांच्या शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला आहे, भविष्यात त्यांनी पँथर्स आर्मीच्या माध्यमातून बेघर नागरिकांना त्यांच्या घरकुलाचा लाभ मिळवून गावोगावी गोरगरीब जनतेच्या पाठीशी खंबीरपणे ढाल बनून ते उभे राहणार आहेत, त्यांनी सांगितले कि लवकरच विविध आंदोलना मार्फत गोरगरिबांचे शासकीय कामे मार्गी लावण्यासाठी लढा दिला जाईल , त्यांची आज पँथर्स आर्मीचे पाचोरा तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्या नंतर ते संपूर्ण पाचोरा शहर व ग्रामीण भागातील गाव तिथं शाखा निर्माण करून शोषित पीडित वंचित घटकाला न्याय मिळवून देऊन संपूर्ण पाचोरा तालुका हा पँथर्स मय करील असे ठाम पणे त्यांनी यावेळी सांगितले आहे ,त्यांच्या निवडीबद्दल पँथर्स आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर भाई खिल्लारे यांनी पँथर्स आर्मीच्या वतीने अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या निवडी बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber