महाराष्ट्र
माजी प्रधानमंत्री भारतरत्न स्व. राजीव गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन,जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा

जळगाव,दि. 20 – येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज सद्भावना दिन साजरा करण्यात आला.
माजी प्रधानमंत्री भारतरत्न स्व. राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अभिवादन करून उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना सद्भावना दिनानिमित्त प्रतिज्ञा दिली.
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी महसुल श्रीमती शुभांगी भारदे, प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसिलदार सर्वसाधारण सुरेश थोरात, तहसिलदार महसुल पंकज लोखंडे यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते

बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



