जळगाव,दि.28: प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2021-22 खरीप हंगाम करीता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी योजना राबविण्यात आली होती. याअंतर्गत विमा कंपनीकडून 27 कोटी 7 लाख 29 हजार रुपयांची (2707.29 लाख रुपये) भरपाई मंजूर झाली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.
या योजनेअंतर्गत अमळनेर, पारोळा व चोपडा या तालुक्यातील उडीद, मूग आणि अमळनेर तालुक्यासाठी, बाजरी/कापूस या पिकांसाठी खरीप हंगामातील पावसाच्या खंडामुळे प्रतिकूल परिस्थिती (Mid season Adversity) निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या पिकांची अधिसूचना काढून विमा कंपनीला 25 टक्के आगाऊ नुकसान भरपाई रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देण्याचे आदेशित केले होते. तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनीही याबाबत शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे आयसीआयसीआय लोबार्ड (भारती एक्सा) विमा कंपनीकडून एकूण २७०७.२९ लाख रक्कम मंजूर झालेली आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377