अमोल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा अध्यात्मिक आघाडीचा अनोखा उपक्रम
पाचोरा आणि भडगाव तालुक्यात भव्य किर्तनाचा सप्ताह
पाचोरा- येथील भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांचा दिनांक १५ नोव्हेंबर रोजीच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने दोन्ही तालुक्यांत लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार असून,भाजपा अध्यात्मिक आघाडीच्या वतीने अमोल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा आणि भडगाव तालुक्यात भव्य किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.आज दिनांक ०९ नोव्हेंबर पासून आठवडाभर हा सप्ताह चालणार असून दोघेही तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर भव्य किर्तन सप्ताहाचे गाव निहाय नियोजन खालील पद्धतीने असेल
१) दि. ०९/११/२०२१ मंगळवार
ठिकाण-अग्नावती नदी पात्र,बाजार नगरदेवळा ता.पाचोरा
किर्तनकार महाराज- ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर
२) दि. १०/११/२०२१ बुधवार
ठिकाण-मारुती मंदिर गांधी चौक, गोंडगांव,ता.भडगाव
किर्तनकार महाराज- ह.भ.प.प्रकाश महाराज साठे,बीड धारूर
३) दि. ११/११/२०२१ गुरुवार
ठिकाण-विठ्ठल मंदिर चौक,कुरंगी ता. पाचोरा
किर्तनकार महाराज- ह.भ.प.कन्हैया महाराज राजपूत, राहेरे
४) दि. १२/११/२०२१ शुक्रवार
ठिकाण-महादेव मंदिर खडकदेवळा,ता.पाचोरा
किर्तनकार महाराज- ह.भ.प.गोविंद महाराज गोरे, आळंदी
५) दि. १२/११/२०२१,शुक्रवार
ठिकाण- वाडे ता.भडगाव
किर्तनकार महाराज- ह.भ.प.तुकाराम महाराज मुंडे शास्त्री,परळी
६) दि. १३/११/२०२१ शनिवार
ठिकाण-छ.शिवाजी महाराज चौक,गुढे ता.भडगाव
किर्तनकार महाराज- ह.भ.प.
ज्ञानेश्वर महाराज जळकेकर
तरी पाचोरा व भडगाव तालुक्यातील नागरिकांनी तसेच भजनी मंडळ,वारकरी सांप्रदाय आणि किर्तन प्रेमींनी ह्या किर्तन सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आव्हान भारतीय जनता पार्टी पाचोरा-भडगावच्या वतीने करण्यात आले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377