.
पाचोरा:-येणाऱ्या नगर पालिका निवडणुकीसह इतर निवडणूकांच्या स्वबळावर तयारीला लागा असा संदेश देत पक्षाचे काम करेल तोच पदावर राहील असा इशारा कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदिपराव पवार यांनी दिला आहे.
येथील शहर व तालुका कॉंग्रेस ने शक्ती प्रदर्शन करत भव्य मेळाव्याचे आयोजन दैवयोग पाटील मल्टीपर्पज हॉल मध्ये करण्यात आले होते या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदिपराव पवार होते तर प्रमुखस्थानी जळगाव शहर अध्यक्ष शाम तायडे, प्रदेश सरचिटणीस विनोद कोळपकर, जिल्हा प्रशासन सरचिटणीस जमील शेख, सरचिटणीस जनसंपर्क ज्ञानेश्वर कोळी, सेवादल जिल्हाध्यक्ष संजय पाटील, एस टी सेल प्रदेश सरचिटणीस राहुल मोरे, तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष शरीफ खाटीक, भडगाव तालुका अध्यक्ष रतीलाल महाजन, शहर अध्यक्ष दिलीप शेंडे, महिला अध्यक्षा ऐश्वर्या राठोड, महीला जिल्हा सरचिटणीस संगिता नेवे, प्रदीप देशमुख, रवी जाधव, जिल्हा युवक उपाध्यक्ष अंबादास गिरी,प्रदीप सोनवणे, प्रा. एस डी पाटील, शेख इस्माईल शेख फकीरा,सौ. क्रांती पाटील, महीला शहर अध्यक्षा शीला सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
मेळाव्यात पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष श्री पवार म्हणाले की, पक्षाचे संघटन खुप महत्वाचे आहे जळगाव जिल्ह्य़ात पक्षाची परीस्थिती भक्मक करण्याचे काम सुरू आहे म्हणून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दौरे करण्यात आले आहेत पाचोरा हा शेवटचा दौरा होता. पाचोरा तालुका हा कॉंग्रेस ला माणणारा तालुका असुन भविष्यात या तालुक्याचे संघटन हे मजबूत करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्याबद्दल तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी व शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण यांचे कौतुक करुन मेळाव्यात नव्याने प्रवेश घेणारे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते याचेही शेवटी श्री. पवार यांनी कौतुक केले. यावेळी मेळाव्याचे प्रास्ताविक भाषणात तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी कॉंग्रेस कार्यकर्ता हा शहरात व तालुक्याच्या जनतेच्या प्रत्येक कामात पडत असुन येणाऱ्या काळात गाव तीथ कमिटी असा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तर शेतकरी वर्गा साठी ” कॉंग्रेस हेल्प कीसान ” ” कॉंग्रेस रोजगार हेल्फ ” सह कॉंग्रेस आरोग्य सेवक अशा संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी नवीन लोकांचा जम्बो प्रवेश सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमात राजु महाजन, अॅड अमजद पठाण, इरफान मनियार, यांनी मनोगत व्यक्त केले मेळाव्याचे सुत्रसंचल अमजद मौलाना, डॉ अनिरुद्ध सावळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल शिंदे, कल्पेश येवले, गणेश पाटील, प्रदीप चौधरी, शरीफ शेख रवी पाथरवट, शिवराम पाटील, बबलु ढाकरे, सचिन पाटील,सचिन सोनवणे आदींनी परिश्रम घेतले
.
.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377