आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

जागतिक महिला दिनानिमित्ताने कासोदा पोलीस स्टेशन तर्फे जन प्रबोधन एक ध्यास दक्ष नागरिक,जनजागरण संगीतमय एकपात्री पथनाट्य सादर

सु-लक्ष्मी संस्थेच्या वतीने महिलांचा सन्मान संकल्पना :- पोलिस ठाणे कासोदा, एरंडोल जिल्हा जळगाव

जागतिक महिलादिना निमित्ता चे औचित्य साधून कासोदा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये
पथनाट्य सादर करण्यात आले.
सादरकर्ते :- ज्युनिअर चार्ली सोमनाथ स्वभावने, समाजसेवक सुमित पंडित,यांच्या मुख्य अभियानातून पोलीस ठाणे कासोदा हद्दीत आपल्या मुख्य अभिनयातून विविध गाण्यांतून जनतेस सावधान राहण्याचे आव्हान करण्यात आले,चोऱ्यांचे वाढते प्रमाण, सोशल मीडियाद्वारे फसवणुकीचे गुन्हे वाढल्यामुळे जागतिक महिला दिनानिमित्ताचे ओचीत्य साधून कासोदा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक निता कायटे यांनी एक संकल्पना आखली.ग्राम सुरक्षा दल व पोलीस मीत्र मा.पोलीस अधिक्षक डॉ प्रवीण मुंढे यांच्या आदेशाने पो स्टे हद्दीतील तरुनांना प्रेरीत करुन त्याना ग्राम सुरक्षा दलातील कार्ड वाटप करन्यात आले. त्यात नागरिकांना जनजागृती केली पाहिजे विविध प्रयोगांतून नागरिकांना कसे सतर्क राहण्याचे आव्हान करता येईल,त्यासाठी माणुसकी समूहाचे समाजसेवक सुमित पंडित, प्रसिद्ध जूनियर चार्ली सोमनाथ स्वभावने यांच्याशी संपर्क करून आपण जनतेला कासोदा शहर हद्दीत जनजागृती चा आपल्या मूक अभिनयाआतून एक वेगळा संदेश देऊया ! असा निर्धार केला आणि प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचून त्यांना चोरी, मारामारी,चैन स्नँकींग पाॅकेट मारी दुचाकी चार चाकी यापासुन सतर्क कसे राहावे याची जनजागृती केली! त्यात त्यांची साथ लाभली ती माणुसकी रुग्णसेवा समूहाची दिनांक ०८/०३/२०२२ रोजी या कार्यक्रमाची सुरुवात कासोदा पोलिस स्टेशन पासून करण्यात आली. त्यात गावातील महिलांना जन जागृती करण्यात आली.या कार्यक्रमांमध्ये सावधान सणाला गावी जात आहात तर घरफोड्या रोखण्यासाठी शहर पोलिसांनी राबवलेली आपला शेजारी,खरा पहारेकरी या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातुन नागरिकांना सतर्क राहण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला दिला.

या कार्यक्रमासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता कायटे ,या गावी कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाला हजेरी लावली होती,ज्युनिअर चार्ली सोमनाथ स्वभावने व माणुसकी समुहाचे समाजसेवक सुमित पंडित यांनी एकपात्री पथनाट्य सादर केले.आदींनी उपस्थित राहून कार्यक्रम पार पाडला.त्यात निता कायटे साय्यक पोलीस निरीक्षक,नरेश ठाकरे पो हे का,मनोज पाटील मपोका,सविता पाटील पोका, इम्रान पठाण पोका,स्वप्नील परदेशी ,पोका,प्रवीण हटकर पोका,प्रदिप परदेशी आदिनी सहकार्य केले

"आपला शेजारी,खरा' पहारेकरी या संकल्पनेतुन नीता कायटे यांनी मागदर्शन केले.

सध्याच्या परिस्थितीत वेगवेगळ्या अफवा सोशल मीडिया द्वारे पसरविन्यात येत आहे. तरी अश्या प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवु नये कोणत्याही सोशल मीडिया तिला फोन वर भरोसा ठेवू नये कासोदा शहरात घरफोड्या,
दरोडे,दुचाकी चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेता आपल्या दुचाक्यांना जी पि आर एस शिष्टम किंवा लोखंडी साखळी,आपल्या गाड्याना बसवावे,व रोकड,बॅंकेत ठेवा पैशांची आवश्यकता असल्यास शक्यतो आँनलाईन व्यवहाराला सावधानता बाळगून प्राधान्य द्या,आपल्या मोबाइलचा पासवर्ड कोणालाही देऊ नका,ऑनलाईन व्यवहार करताना स्वत ची खबरदारी स्वत च घ्या,सोसायटय़ा बंगले रो हाउस अशा ठिकाणी वॉचमन सुरक्षारक्षक नेमावे,
सीसीटीव्ही बसवावेत,आपला शेजारी आपला खरा पहारेकरी असतो अशा शब्दांत त्यांनी प्रत्यक्ष नागरिकांना जाऊन आवाहन केले.ज्युनिअर चार्लीने व माणुसकी समुहाने ज्या पथनाट्यातुन जनतेस आव्हान केले कि दक्ष नागरीकांनी घ्यावयाची काळजी त्याबद्दल त्याचे पोलीस प्रशासनातर्फे आभार मानते.
                                                                                                        सहाय्यक पोलिस निरिक्षक निता कायटे, पोलीस स्टेशन, कासोदा

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!