जामनेर: – तालुक्यातील दि शेंदूर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी शेंदूर्णी संचलित अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एकक व ‘ती ची गरुड झेप’ केंद्रातर्गत आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने भित्तिचित्रे, रांगोळी व निबंध स्पर्धा घेण्यात आली. सदरील स्पर्धेचे उदघाटन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर येथील सहायक कुलसचिव तथा भाषा संवर्धन अधिकारी डॉ.शिवाजी शिंदे यांच्या हस्ते पार पडले.या प्रसंगी संस्थेच्या संचालिका कु.देवश्री सतिषजी काशीद, महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा.डॉ.संजय भोळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास, स्त्री भ्रूण हत्या, राष्ट्रीय एकात्मता, बेटी बचाव बेटी पढाव या विषयांवर सादरीकरण केले. या स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सदर स्पर्धेत परीक्षक म्हणून उपप्राचार्या प्रा.निरुपमा वानखेडे, प्रा.रिना पाटील, प्रा.डॉ.आर.डी.गवारे, प्रा.डॉ.वसंत एन.पतंगे यांनी काम पाहिले.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वासुदेव आर.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेच्या आयोजना साठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील, ‘ती ची गरुड झेप’ समन्वयीका प्रा.डॉ.योगिता पी.चौधरी यांनी, विद्यार्थी निलेश बारी, अक्षय पवार, गायत्री पाटील, निकिता चौधरी,निकिता गुजर व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber