श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर,पाचोरा येथे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर,पाचोरा येथे आज पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.समारंभाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती चेअरमन मा.बापूसाहेब जगदीश पंडितराव सोनार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन मा.नानासाहेब संजय ओंकार वाघ, मा.नगरसेवक श्री.भूषण(सनी) दिलीप वाघ,संस्थेचे समन्वयक तथा मा.मुख्याध्यापक जिभुसो.एस.डी.पाटील सर, दादासो. संजय सूर्यवंशी सर,शाळेचे मुख्याध्यापक श्री.अशोक परदेशी सर, बालविकास केंद्राच्या मुख्याध्यापिका श्रीमती.पवार मॅडम,ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती.लक्ष्मबाई सोनवणे मॅडम हे उपस्थित होते. प्रथमत: शाळेतील शिक्षिका श्रीमती चारुशीला पाटील मॅडम यांनी ईशस्तवन सादर करून विद्यार्थिनींनी मान्यवरांच्या स्वागतासाठी ‘स्वागत गीत’ सादर केले. माँ शारदेच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.आय.टी.एस.या स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी स्वरा सोनार,ओम महाजन,सार्थक पाटील,दर्शन धोबी, मृण्मयी राजपूत,अर्णव पाटील,सिद्धेश ठाकरे,हर्षल चौधरी,अक्षरा भोसले यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टरसह पाण्याच्या टाकी साठी शाळेस देणगी देणाऱ्या श्री.व सौ. कुलकर्णी दांपत्याचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे श्रीमती.उज्वला साळुंखे मॅडम व श्रीमती.वर्षा पाटील मॅडम यांच्या संकल्पनेतून सर्वांच्या सहकार्याने शाळेच्या सांडपाण्यावर तयार करण्यात आलेल्या ‘परस बागेचे’ उद्घाटन नगरसेवक मा.दादासो.भूषण(सनी) वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच आज दि.- 8 मार्च ‘जागतिक महिला दिनानिमित्त’ उपस्थित सर्व महिला वर्गाचा संस्था व शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.मा. नानासाहेबांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करून शालेय कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.अशोक परदेशी सर,सूत्रसंचालन श्रीमती.वर्षा पाटील मॅडम ,आभार प्रदर्शन श्रीमती. रुपाली पाटील मॅडम यांनी तर छायाचित्रण श्री. संदीप वाघ सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.