सामाजिक प्रवर्ग निहाय निवडून आलेले उमेदवार याबाबत माहिती कळविन्याचे आवाहन
मा. सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिका (सिव्हील) क्र. 980/2019 व इतर मध्ये दिनांक 4/3/2021 रोजी दिलेल्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरीता जागा राखून ठेवण्याच्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सन 1960 पासुन अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्थापने पासुन यापैकी जो नंतरचा दिनांक असेल तेव्हापासुन ते आतापर्यंत झालेल्या निवडणूकांमधील सामाजिक प्रवर्गनिहाय निवडणुकीस उभे असलेले उमेदवार,सामाजिक प्रवर्ग निहाय निवडून आलेले उमेदवार, यांची माहिती उपलब्ध करुन देणेबाबत मा. मागासवर्ग आयोग यांचे मार्फत कळविण्यात आलेले आहे. सदरची माहिती ही 1960 या पासूनची असल्याने माहिती उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय यांचेमार्फत आवाहन करण्यात येते की, जेष्ठ नागरीक ,जेष्ठ पत्रकार,सामाजिक संस्था,विविध शासकिय संस्थांचे आजी माजी पदाधिकारी यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती, महानगरपालीका,नगरपरीषद ,ग्रामपंचायत याबाबत 1960 पासूनच्या सामाजिक प्रवर्गनिहाय निवडणूकीस उभे असलेले उमेदवार,सामाजिक प्रवर्ग निहाय निवडून आलेले उमेदवार याबाबत माहिती असल्यास संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांना तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावी
.
.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377