दारुड्यांचा बंदोबस्ताठी विद्यार्थी पाहोचले पोलिसांच्या दारी
जिल्हा परीषद कन्या शाळा पाचोरा येथे शिकणारी विद्यार्थीनी उमैमा शेख रईस आपले पालककासह न्याय मांगण्या साठी व दारुड्यांचा बंदोबस्त व्हावा म्हणून पोलीस अधिकाऱ्यांचे दारात पोहोचली. जिल्हा परिषद उर्दु कन्या शाळेच्या आवारात दर रात्री गावातील दारुडे जमतात व तेथे दारू, व्हिस्की, रम पिऊन तेथेच शाळेच्या दारात बाटल्या फोडून जातात. दिनांक 23-3-2022 रोजी जि प उर्दू कन्या शाळा येथे शिकणारी विद्यार्थिनी वर्गात प्रवेश करतांना तिच्या पायात फुटलेल्या दारूच्या बाटलीमुळे जखम झाली. तिचा पाय रक्तबंबाळ झाल्याने विद्यार्थिनी व शिक्षक वर्ग हि घाबरले. जखमी अवस्थेत तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले. रक्त जास्त वाहिल्याने तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आला. दिनांक 25-3-2020 रोजी रात्री दहा वाजता या टोळीला शाळेचे शिक्षक शेख मोहम्मद जावेद अब्दुल रहीम यांनी शाळेतील वर्गांसमोर दारूची बॉटल सह धरले. ह्या शिक्षकाने त्यांना समज दिल्याने त्यातून एक व्यक्ती राहणार पाचोरा हे शिक्षकाचे अंगावर धावून आला. व पोलिसांना व कोणालाही बोलून आण, मला भय वाटत नाही, असे सांगत होता. या मद्यपिंचा बंदोबस्त करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक मंडळ, उर्दू मुलांची शाळा पाचोरा, जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर 1, जागृती विद्यालय पाचोरा, शाळेच्या परिसरात राहणारे लोकांनी माननीय पोलीस निरीक्षक पाचोरा यांच्या सेवेत दारुड्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी लेखी निवेदन दिले आहे. या मैदानाचे आवारात जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर 1, जागृती मराठी विद्यालय पाचोरा, उर्दू मुलांची शाळा, उर्दू कन्या शाळा आहेत व तेथे अल्पसंख्यांक समाजाचे विद्यार्थी, गोंड वस्तीत राहणारे गोरगरीब विद्यार्थी, दलीत व मागासलेले विदयार्थी शिक्षण घेण्यासाठी जातात.
माननीय पोलीस निरीक्षक पाचोरा यांना निवेदन देतेवेळी मुख्याध्यापक एजाज रऊफ बागवान, शेख जावेद रहीम, अजहर खान मोतीवाला, लतिफ मेंमबर, इस्राईल खान,रिजवान खान, सईद शेख, हारून बागवान, सलीम शाह इत्यादी उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377
.
.
.
newscourtsy- सोशल मीडिया