आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचं कार्य अलौकिक; त्यांचे कार्य, विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार करुया – उपमुख्यमंत्री अजित पवार

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे कृतज्ञतापूर्वक अभिवादन

मुंबई, दि. 10 :- “क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवून वैचारिक गुलामगिरीतून मुक्त केलं. स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली करुन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, अनिष्ट रुढी-परंपरांवर हल्ला करुन प्रबोधनाची चळवळ उभारली. शेतकरी, कष्टकरी, महिला, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांना हक्कांची जाणीव करुन देत लढण्याचं बळही दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली. देशाला पुढे नेणारा, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्रांती घडवून आणणारा विज्ञानवादी, सत्यशोधक विचार त्यांनी दिला. महिला आज समाजाच्या अनेक क्षेत्रात आत्मविश्वासानं वावरत आहेत, महत्त्वाच्या पदांवर जबाबदाऱ्या पार पाडत आहेत, मुक्त जीवन जगत आहेत, त्याचं श्रेय क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या त्यागाला आहे. ते खऱ्या अर्थानं क्रांतिसूर्य होते. त्यांच्या प्रगत, पुरोगामी, सत्यशोधक विचारांवर महाराष्ट्राची वाटचाल सुरु असून पुढेही सुरु राहील. क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दोघांचं कार्य अलौकिक असून त्यांचं कार्य, विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज करुया,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दोघांच्या कार्याचं कृतज्ञतापूर्वक स्मरण त्यांना करुन अभिवादन केलं आहे. क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचे सत्यशोधक विचार पुढे घेऊन जाण्यासाठी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!