आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

रविवार दिनांक 24 एप्रिल रोजी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते सामान्य ज्ञान स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा

भगवान महावीर, महात्मा ज्योतिबा फुले ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने खुल्या सामान्य-ज्ञान स्पर्धेचे आयोजन 10 एप्रिल 2022 यादिवशी गो से हायस्कूल पाचोरा या ठिकाणी शिवसेना व युवासेना यांनी केले होते . या स्पर्धेत विजेत्यांना प्रथम पारितोषिक रुपये 5001, द्वितीय पारितोषिक रुपये 3001,तृतीय पारितोषिक रुपये 2001,उत्तेजनार्थ दोन पारितोषिके प्रत्येकी 1001, मुलींमधून प्रथम रुपये 501 अशाप्रकारची भव्य बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व प्रा. राजेंद्र चिंचोले लिखित “स्पर्धा परीक्षा सारथी” हे पुस्तक आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडून भेट देण्यात येणार आहे.
या सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा तसेच नुकत्याच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा दिनांक 24 एप्रिल 22 रविवार रोजी संध्याकाळी 5 वाजता राजीव गांधी टाऊन हॉल पाचोरा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण पाचोरा भडगावचे लोकप्रिय आमदार माननीय श्री किशोर आप्पा पाटील यांचे शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.राजेंद्र चिंचोले हे आहेत.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पाचोर्‍याचे प्रांताधिकारी विक्रमजी बांदल, पाचोऱ्याचे डी वाय एस पी भारतजी काकडे, पाचो-याचे तहसीलदार कैलासजी चावडे, पाचोऱ्याचे पोलीस इन्स्पेक्टर किसनराव नजन पाटीलसाहेब, पी भारतजी काकडे, पाचो-याचे तहसीलदार कैलासजी चावडे, पाचोऱ्याचे पोलीस इन्स्पेक्टर किसनराव नजन पाटीलसाहेब,पाचोरा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर मॅडम,राज्य कर सहआयुक्त शरदजी पाटील ,नगरपालिका गटनेत्या सुनिताताई पाटील, उद्योजक मुकुंद अण्णा बिल्दीकर ,माजी नगराध्यक्ष संजय भाऊ गोहिल, उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय पाटील ,माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, शिवसेना तालुका प्रमुख शरद पाटील, माजी उपनगराध्यक्ष| प्रियंकाताई पाटील, शिवसेना शहर प्रमुख किशोर बारावकर व ज्ञानेश्वर चौधरी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी त्यांचे पालक व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे प्रकल्प प्रमुख प्रवीण ब्राह्मणे ,गजुभाऊ पाटील तसेच शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी यांनी केले आहे.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!