पीयूसी चाचणी दरामध्ये सुधारणा

जळगाव, दि.30 –शासनाच्या निर्देशानुसार पीयूसी चाचणी दरामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे.वाहनांमधून उत्सर्जित होणाऱ्या धुरांमधून विषारी वायू बाहेर पडत असतात. त्यामुळे वायुप्रदूषणात भर पडते. वायूच्या उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने वाहनांची प्रदूषण नियंत्रण चाचणी (पोल्युशन टेस्ट सर्टिफिकेट-पीयूसी) करणे बंधनकारक केले आहे. ज्यामध्ये दुचाकी वाहन – सध्याचे दर – 35- सुधारित दर 50 पेट्रोलवरील तीनचाकी वाहन – सध्याचे दर – 70- सुधारित दर 100, पेट्रोल,सीएनजी, एलपीजीवर चालणारे चारचाकी वाहन – सध्याचे दर – 90 व सुधारित दर – 125, डिझेलवर चालणारे वाहन – सध्याचे दर – 110 सुधारित दर -150 असे आहेत, असे उप प्रादेशिक परिवहन अधकारी श्याम लोही यांनी कळविले आहे.
.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



