महाराष्ट्र
गुरु तुझ विण नाही दुजा आधार
पाचोरा,दि१३ – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर,पाचोरा येथे आज गुरुपौर्णिमा (व्यासपौर्णिमा) उत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती. जयश्री पाटील मॅडम होत्या.प्रथमत: महर्षी व्यासांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तदनंतर इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून गुरुंना वंदन करत त्यांच्याविषयी ऋण व्यक्त केले. श्रीमती.चारुशीला पाटील मॅडम व मा.अध्यक्षांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना गुरूंची महती सविस्तरपणे विशद केली. गुरूंनी केलेल्या उपदेशाचे आपण आपल्या आयुष्यात सदैव आचरण करावे असा संकल्प विद्यार्थ्यांकडून करून घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री.दीपक पाटील सर यांनी केले.
सबसे बडा गुरु गुरूसे बडा गुरू का ध्यास
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377