जन्मभूमीतील सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
तापोळा ता. महाबळेश्वर येथे ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार
सातारा,दि.12: ‘मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक जिल्ह्यांना भेटी दिल्या. यावेळी विविध मान्यवरांकडून माझा सत्कार करण्यात आला. पण, माझ्या जन्मभूमीत झालेला माझा सत्कार ही आनंदाची बाब असून जनतेच्या हिताचे निर्णय घेताना प्रेरणादायी ठरेल’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
तापोळा ता. महाबळेश्वर येथे तापोळा ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा सहकुटुंब नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्यासह तापोळा गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. अतिवृष्टीमुळे तीन हेक्टरपर्यंत झालेल्या पिकांची नुकसान भरपाई दुपटीने देण्यात येणार आहे. राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न राहणार असून राज्यात मोठे उद्योग उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. महाबळेश्वर-तापोळा रस्त्यासह पश्चिम महाराष्ट्र कोकणाला कसा जोडला जाईल, यासाठी दळणवळण यंत्रणा अधिक सक्षम केली जाईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377