आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे भारतीय सैनिक श्री.राकेश पाटील यांचे मार्गदर्शन

पाचोरा दि १८ – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत भारतीय सैनिक श्री.राकेश पाटील यांचे विशेष मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना आर्मीमधील शिस्त खूप महत्वाची असते आणि हीच शिस्त माणसाला घडवते. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करून त्यांना प्रेरित केले. तसेच विद्यार्थ्यांना भविष्याचे उगवते तारे म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते असे मत व्यक्त केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. अशोक परदेशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच स.11 वा.सामूहिक राष्ट्रगीत घेऊन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राहुल वाघ सर यांनी तर आभार श्री.भूषण पाटील सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!