पोलीस बॉईज आदीत्य चे शॉक लागल्याने निधनाने

पाचोरा- पाचोरा उपविभागीय अधिकारी भारत काकडे यांचा सारथी ए एस आय अशोक महाजन यांचा एकलुता एक मुलगा आदीत्य अशोक महाजन (१९) हा पाणी भरण्यासाठी काल सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास इलेक्ट्रीक मोटर ची पिन काढायला गेला असता त्याचे इलेक्ट्रिक शॉक लागुन निधन झाले. आदीत्य हा इंजिनिअरिंग चे शिक्षण नांदेड येथे घेत होता. पोलीस लाईन मध्ये सालाबाद प्रमाणे गणेश स्थापना पोलीस बॉईज करत असतात यासाठी आदीत्य आला होता. त्याच्या दुदैवी जाण्याणे शहरात शोककळा पसरली अशोक महाजन यांना एक मुलगा एक मुलगी होत. आदीत्यचे असे अकाली निधन झालेने पोलिस वसाहतीत शोकमय चित्र निर्माण झालेले पहावयास मिळाले.पोलीस परीवाराच्या दुःखात पोलिस कर्मचारी वृद सहभागी असल्याचे तसेच तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनीही शोक व्यक्त करीत असल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



