आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

पाचोरा येथील नेरीच्या शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठीचे उपोषण सूटले

पाचोरा,दि २१ – तालुक्यातील नेरी येथील शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठीचे उपोषण कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आज सुरू केले होते. तहसीलदार कैलास चावडे यांनी तात्काळ कारवाईचे लेखी आश्वासना नंतर शेतकऱ्यांनी उपोषण सोडले.

पाचोरा तालुक्यातील नेरी गावातील २०० शेतकऱ्यांची शेती गडद नदीच्या पलीकडे भडाळी शिवारात आहे. गेल्या चार वर्षांत मृद जलसंधारण विभागाने चुकीचा सर्वे करुन बंधारा बांधला असे ग्रामस्थांचे बोलणे होते त्यामुळे सदर चा रस्ता हा नेरी ते सार्वे ग्रामीण असुन तो पाण्यात गेल्याने अल्पभूधारक शेतकर्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नाही त्यामुळे आमरण उपोषण तहसीलदार कचेरी समोर आज दि. २१ रोजी सुरू केले होते. तहसीलदार यांनी संबंधित विभागाला लेखी आदेश दिले यात जिल्हा परिषद ने तात्काळ पुलासाठी अंदाज पत्रक तयार करून शासनाने कडे पाठवण्यात येवुन मृदू जल संधारण विभागाने तात्काळ चौकशी करावी तसेच स्व. धर्मा बेडर यांना मुख्यमंत्री सहायता निधी मधुन मदत करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव पाठविण्यात येईल असे आश्वासन तहसीलदार श्री चावडे यांनी उपोषणकर्ते शेतकऱ्यांना दिले.
यावेळी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष शेतकरी नेते सचिन सोमवंशी यांना उपोषणकर्त्यांचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार श्री कैलास चावडे यांनी सरबत देऊन उपोषण सोडले यावेळी मृद संधारण चे उपविभागीय अभियंता एस डी निकम, नायब तहसीलदार संभाजी पाटील, शिवसेनेचे शेतकरी प्रमुख अरुण पाटील, हरीभाउ पाटील, राजेंद्र महाजन, इरफान मनियार, शरीफ शेख, राहुल शिंदे उपस्थितीत होते. नेरी येथील शेतकरी काशिनाथ अहीरे, बंटी भोई, याकुबखा पठाण, सुनिल पाटील, विजय सुर्यवंशी साहेबराव बोरसे, आधार गढरी, दादाभाऊ मोरे, हेमराज बोरसे, सुरेश गढरी, जिभाउ पाटील, मुकुंदा पाटील विमलबाई अहीरे सकुबाई भोई सरुबाई पाटील दगुभाई भोई शरीफाबाई पठाण मालाताई मोरे बालु भोई बंडु भोई,तुकाराम भोई भगवान भोई आदींसह शंभरहून अधिक पिढीत शेतकरी उपस्थित होते.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\