पाचोरा (मोंढाळा) -दि.15 ऑक्टो रोजी जि प मराठी शाळा मोंढाळे येथे प्रेरणा सभा घेण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी पाचोरा तालुक्या चे गट शिक्षणाधिकारी श्री नरेंद्र चौधरी साहेब होते या प्रसंगी डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन केले व प्रेरणा सभेत गट शिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी साहेबांनी बाला उपक्रमांतर्गत सभेस शाळेसाठी लोक वर्गणी करण्याचे विनंती पर आवाहन केले. शाळेस भौतिक सुविधा, रंग रंगोटी स्वच्छता गृह, शैक्षणिक,भौमितीक आकाराचे ओटे बांधणे, शाळे चा संपूर्ण परिसर बदल होईल याबाबत सभेस समजावून सांगितले तसेच वाडी केंद्राचे केद्र प्रमुख श्री ब्राह्मणे सरांनी याबाबत शाळेस मदत करण्यासाठी प्रोत्साहित केले.
सभेस सरपंच, उपसरपंच व सदस्य तसेच.अध्यक्ष व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य पोलीस पाटील, माता पालक संघ अध्यक्ष व सदस्य पालक बंधू भगिनी उपस्थित होते प्रास्ताविक व मार्गदर्शन श्री मनोहर सोनवणे सर यांनी केले, कोरे सरांनी बाला उपक्रमाचे महत्व सांगितले तसेच तसेच सौ प्रतिभा पाटील मॅडमांनी परसबाग बाबत मार्गदर्शन केले. उपस्थित ग्रामस्थां मार्फत श्री धनराज पाटील सरांनी शाळेस या उपक्रमांतर्गत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व शाळेस आर्थिक मदत दिली .उपस्थितांमध्ये सरपंच सौ कल्पनाताई पुंड,उप सरपंच ज्ञानेश्वर आखाडे, पोलीस पाटील नविन पाटील, राजू आप्पा सूर्यवंशी,रविद्र पाटील,काशिनाथ भाऊ,वाल्मिक पाटील,समाधान, हिरामण वाघ , गफूर तडवी, आलेखां तडवी,केशव पुंड,गोपिचंद आप्पा यांनी आर्थिक मदत दिली सूत्रसंचालन श्री कोरे सर यांनी केले तर सुरेश पाटील सर,चौधरी सर, सौ जोशी मॅडम यांनी सदर कार्यक्रम यशस्वितेसाठी विशेष मेहनत घेत सहकार्य केले
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377