तरूणांच्या हातांना काम, शेतकर्याना सुरळीत विज पुरवठा, सुसज्ज शेत रस्ते, महीलांना बचत गटाच्या माध्यमातून स्वयंमपुर्ण करणे, शहरांसह ग्रामिण भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढणे आणि मतदार संघातील शंभर टक्के मुलभुत सुविधा निर्माण करणे या पंचसूत्री नुसार आराखडा तयार करून आगामी काळात मतदार संघात विकासाचा वेग दुप्पट वेगाने करण्याचा माझा वाढदिवसाच्या निमित्ताने संकल्प केला आहे असे आमदार कीशोरआप्पा पाटील यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बोलतांना सांगीतले.
ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारच्या विविधांगी योजनांसह डीपीडीसी व इतर शासकीय विभागांच्या योजनांचा अभ्यास करून ,कामांच्या मागणीचा प्रस्ताव मांडून व त्याचा सातत्याने पाठपुरावा करून शासनाकडुन विकास कामे मंजूर करून आणली. आणि ती पूर्णत्वास नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. जनतेला दिलेले वचना इतकेच नाही दिले तर त्यापेक्षा जास्त कामे केल्याचा विश्वासपुर्वक दावा आमदार किशोर पाटील यांनी बोलताना व्यक्त केला केला
हजार तरूणांना रोजगार देणार
पाचोरा-भडगाव तालुके हे बागायती असली तरी मोठा रोजगार निर्मल सीडस वगळता रोजगार देऊ शकेल असा मोठा उद्योग दोन्ही तालुक्यात नाही. दोन्ही तालुक्यात कापसाचे मुख्य उत्पादन घेतले जाते. त्यामुळे सहकारी तत्वावर सुतगिरणी सुरू करण्याचे नियोजन आहे. पाचोरा तालुक्यात सुतगिरणीची प्रक्रीया पुर्ण झाली आहे. एक महीन्याच्या आत शासनाकडुन 18 कोटीचा हप्ताही पडणार आहे. त्यामुळे लवकरच प्रत्यक्षात कामाला गती मिळेल. तर भडगाव तालुक्यात ही एक सुतगिरणी सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 2024 पर्यंत या सुतगिरण्या सुरू होऊन मतदारसंघातील कीमान दोन हजार तरूणाना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे. याशिवाय रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रिकाम्या हातांना कामे उपलध्द करून देण्याचा प्रयत्न असणार आहे.
प्रत्येक गावात देणार व्यायामाचे साहीत्य
मतदार संघातील 150 गावांना आमदार निधीतुन व्यायामाचे साहीत्य उपलध्द करून देण्यात येणार आहे असे आमदार कीशोरआप्पा पाटील यांनी सांगीतले. तरूणांना आवश्यक साहित्य यात मिळणार आहे. त्याचा फायदा तरूणांना होईल. पुढच्या एक महीन्यात साहीत्य प्रत्येक गावात वितरीत करण्यात येणार आहे.
100 टक्के शेत रस्ते करणार
पाचोरा-भडगाव तालुक्यातील सर्व शेत रस्ते मातोश्री पानंद रस्त्याच्या माध्यमातून पुढच्या दोन वर्षात पूर्ण करण्याचा संकल्प आहे. आता 81 कीलोमिटरचे शेत रस्ते मंजुर केले आहेत. त्यांचे लवरकच कामे सुरू होतील. तर राहीलेले सर्व 100 टक्के रस्ते करण्याचा मानस आहे. याशिवाय वीज सबस्टेशनची संख्था वाढवून शेतकर्याना सुरळीत आणि उच्च दबाने वीज देण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय हमीभाव केंद्र स्वयंपुर्ण करून शेतकर्याच्या माला योग्य भाव मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. कृषी प्रक्रीया उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न आहे. तर सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी प्राधान्य आहे असे आमदार कीशोर पाटील यांनी सांगीतले.
50 वर्षाच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निकाली
आगामी पन्नास वर्षांचा विचार करून मतदार संघातील प्रत्येक गावात नव्याने पाणीपुरठा योजना मंजुर केल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्याचा प्रयत्न केला आहे.
तर भडगाव शहरात गिरणा नदिवर बंधार्यासह 110 कोटीची पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आहे. पाचोरा शहरासाठी ही वाढीव पाणीपुरवठा योजना टाकण्यात आली आहे.
गिरणे’ वर पाच पुल
भडगाव शहरात जुन गाव ते पेठ भागाला जोडण्यासाठी बर्याच दिवसापासून पूलाची मागणी होती. त्या अनुशंगाने सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न सोडविण्याला यश आले आहे. याशिवाय पाढंरथ ते निंभोरा पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. गुढे ते नावरे, भडगाव ते जुना वाक रस्तावरील पुलाचे काम ही सुरू झाले आहे. तर पाचोरा तालुक्यातील माहीजे येथील गिरणेवरचा पुलाला ही मंजुरी भेटली आहे. याशिवाय पाचोरा शहरात कृष्णापंरी भागात नदिवर तब्बल तिन पुलाचे कामे मार्गी लावण्यात यश आले आहे. तर बाळद येथे ही तितुर नदिवर पुलाचे कामाला गती मिळाली आहे.
भडगाव तालुका बनला विजेच्या बाबतीत स्वयंपुर्ण
आमदार किशोरआप्पा पाटील यांनी आपल्या कार्यकाळात पाचोरा व भडगाव शहरासह तालुक्यातील विविध गावात गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणारा वीज भारनियमनाचा तसेच सतत विजेच्या होत असलेल्या लपंडावाचा प्रश्न मोठ्या प्रयत्नाने सोडवला. भडगाव तालुक्यात 132 केव्हि सबस्टेशन नसल्याने वीज समस्येला सामोरे जावे लागतं होते. आमदार कीशोर पाटील यांनी सबस्टेशनच्या प्रश्नांसाठी विधानभवनाच्या पायरीवर उपोषण केले. त्यामुळे 132 सबस्टेशन मंजुर होऊन सद्य:स्थितीतीला सबस्टेशन कार्यान्वित झाले आहे. याशिवाय मतदारसंघात वीज उपकेंद्राची संख्या कमी असल्याने आहे त्या वीज केंद्रांवर प्रचंड भार पडत होता. त्यामुळे सतत वीज खंडित होणे कमी दाबाने वीज पुरवठा होणे व वीज भारनियमन यात सातत्याने वाढ होत होती .त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील रहिवाशी कमालीचे वैतागले होते याचा परिणाम शेती उत्पादन कमी होण्यावरही झाला होता कृषिपंपांना पुरेशा दाबाने व पूर्णवेळ वीजपुरवठा मिळत नसल्याने पिकांना पाणी देऊन जगवणे अशक्य होते हा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी व मतदारसंघातील जनतेला वीज भारनियमनाचा शॉक बसू नये यासाठी पाचोरा तालुक्यातील तारखेडा, लासगाव ,माहिजी, येथे कोट्यावधी रुपये खर्चाची वीज उपकेंद्राची उभारणी केली यासोबतच जीर्ण झालेले सुमारे दोनशे विजेचे खांब तसेच कमी क्षमतेचे ट्रांसफार्मर बदलून ज्यादा क्षमतेचे ट्रांसफार्मर बसवले .भडगाव तालुक्यातील वडजी, लोणपिराचे ,वडधे येथे नवीन वीज उपकेंद्राची उभारणी केली त्यासाठी पाचोरा व भडगाव तालुक्यात सुमारे 50 कोटी रुपये खर्चाची वीज उपकेंद्राची, विद्युत जनित्र व वीज खांबांची उभारणी झाल्याने व क्षमता वाढविण्यात आल्याने आता विजेचा प्रश्न कायमचा मिटल्याने शेतकर्याच्या चेहर्यावर समाधान पहायला मिळते.
पर्यटन विकासाला दिली चालना. . . !
पाचोरा व भडगाव तालुक्याला ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वारसा व महत्व आहे. या धार्मीक स्थळांचा विकास व्हावा व ही ठिकाणे पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत विकसित करावीत त्यानुषंगाने राज्यभरातील भाविक या धार्मिक स्थळांचा लाभ घेतील व त्यानिमित्ताने विविध व्यवसाय विकसित होऊन आर्थिक उलाढाल वाढेल या हेतूने आमदार किशोर पाटील यांनी विविध विकास कामे करत असताना पाचोरा येथील राम मंदिर परिसर, लोहटार येथील चतुर्भुज नारायण मंदिर परिसर ,माहिजी व पिंपळगाव हरेश्वर येथील मंदिर परिसर विकासासाठी पर्यटन विकास योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करून त्यासाठी 1कोटी78 लाख रुपयांचा निधी त्यांनी मंजूर केला आहे. तिर्थक्षेत्र विकास अंतर्गत सावखेडा येथे भैरवनाथ महाराज देवस्थानासाठी 1 कोटी 75 लाखांचा निधी आणून ही धार्मिक स्थळे विकसित केली आहेत. भडगाव तालुक्यात श्रीक्षेत्र कनाशी येथे महानुभाव पंथ मंदिराचे विकास कामासाठी 1 कोटी 19 लाखांचा तर गिरणा नदी पात्रालगत च्या स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्रासाठी 3 कोटी रुपयांचा निधी आणून या मंदिरांचा परिसर सुशोभित व विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय पुढच्या टप्प्यात बहूळा धरणाचा, काकणबर्डी परीसर व भडगाव शहरातील डंपिंग ग्राऊंड लगतच्या परीसराचा पर्यटनाच्या अंगाने विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार कीशोरआप्पा पाटील यांनी सांगीतले.
पाचोरा शहर जिल्ह्यात माॅडेल!
पाचोरा शहर जिल्ह्यात विकासाचे माॅडेल म्हणुन पुढे येत आहे. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी भाजी व फळ विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटत होती. त्यामुळे बहुतांश रस्ते व चौकात अतिक्रमण व वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न भेडसावू लागला होता. तसेच ग्राहकांना देखील प्रचंड मनस्ताप सोसावा लागत असे सर्व भाजी व फळ विक्रेते एकाच छताखाली यावेत त्यासाठी सर्व सोयींनी युक्त अशी भाजी मंडई उभारण्यात आली आहे. तर स्मशानभुमी, वाचनालय, शाॅपिग काॅम्पलेक्स शहराचे वैभव वाढणारे आहे. याशिवाय शहरातील भुमिगत गटारी विकासाचे मापदंड ठरले आहे. याबरोबरच काॅलेज चौक ते रेल्वे उड्डाण पुला दरम्यान राष्ट्रीय महामार्गलगत फुटपाथ, समातंर रस्ते, स्कायवॉकसाठी निधी मंजुर झाला आहे. ते कामे शहराची सुंदराता वाढविणारे ठरणार आहे.
ओपन स्पेस चे भाग्य उजळले
पाचोरा-भडगाव शहरातीर ओपन स्पेसचे भाग्य उजळले आहे..पाचोरा शहरात तब्बल 198 ओपनस्पेस विकसीत होताहेत तर भडगावातीर जवळपास 75 ओपनस्पेसचा विकास होणार आहे. त्यासाठी शासनाकडुन निधी मंजुर झाला आहे. पुढच्या 1 महीन्यात कामांना सुरवात होणार आहे. पुढच्या टप्प्यात या ओपनस्पेस मधे खुल्या जीम करण्याचा मानस असल्याचे आमदार कीशोरआप्पा पाटील यांनी सांगीतले.

बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377