पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गोसे हायस्कूल पाचोरा येथे शूर वीर योद्धा शहीद बिरसा मुंडा यांची जयंती आणि 15 नोव्हेंबर शिक्षकेतर कर्मचारी दिन, साजरा करण्यात आला.
पाचोरा,दि 16- तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गोसे हायस्कूल पाचोरा येथे शूरवीर योद्धा शहीद बिरसा मुंडा यांची जयंती व शिक्षकेतर दिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मुख्याध्यापिका सौ प्रमिलाताई वाघ यांनी शहीद बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली याप्रसंगी पर्यवेक्षक श्री आर एल पाटील, श्री ए बी अहिरे, विभाग प्रमुख श्री बावीस्कर सर, सांस्कृतिक प्रमुख श्री आर बी तडवी, श्री आर बी बांठीया, श्री कुमावत सर, सौ मुक्ता पाटील, सौ आरती पाटील व सौ सोनाली सूर्यवंशी मॅडम उपस्थित होते. तसेच शिक्षकेतर कर्मचारी बंधू ही उपस्थित होते. तसेच आज 15 नोव्हेंबर हा शिक्षकेतर कर्मचारी दिन असल्याने वरिष्ठ लिपिक धनराज सोनवणे आणि बबन पाटील, कनिष्ठ लिपिक अहिरे आणि श्रीकांत अहिरे प्रयोगशाळा सहाय्यक स्मिता सोनवणे ज्येष्ठ शिपाई बंधू श्री विजय पाटील, विकी धनगर, नाना साळवे, जगदीश, गौरव सोनवणे या सर्वांचा शिक्षकेतर कर्मचारी दिनानिमित्त सत्कार करण्यात आला याप्रसंगी धनराज सोनवणे आणि विजय पाटील यांनी सत्काराला उत्तर दिले आणि ऋण व्यक्त केले
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377