आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडण्याचे आवाहन

जळगाव जामनेर तालुक्यातील मौजे टाकळी खुर्द ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी तहसील कार्यालय जमणार येथे सुरळीत व शांततेत पार पडलेली आहे. मतमोजणीनंतर गाव पातळीवर दोन विरोधी गटांमध्ये दगडफेक झाली असून दोन इसमाना किरकोळ स्वरूपाची दुखापत झालेली आहे. तसेच त्याच गावातील धनराज श्रीराम माळी वय 35 हे अचानक बेशुद्ध होऊन मयत झालेले आहेत. मयत धनराज माळी हे उमेदवार नसून तेथील उमेदवाराचे भाऊ होते. वैद्यकीय अधिकारी श्रेणी उपजिल्हा रुग्णालय जामनेर यांच्याकडील शवविच्छेदन अहवालात Problem Cause of Death is due to Mayocardial Infection However Viscera is Preserved For Confirmation असे नमूद केलेले आहे.
तोपर्यंत नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तालुका कार्यकारी दंडाधिकारी त्याचा तहसीलदार जामनेर यांनी केलेले आहे.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\