साई मंदिर परिसरास “संत सेवालाल महाराज चौक” नामकरण करण्यात यावे.

पाचोरा- शहरातील भडगाव रोडवरील साई मंदिर परिसरास “संत सेवालाल महाराज चौक” नामकरण करण्यात यावे. अशा आषयाच्या मागणीचे निवेदन आज २९ डिसेंबर रोजी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे विजे. एन. टी. शहर अध्यक्ष राहुल राठोड यांच्या नेतृत्वाखालील नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना देण्यात आले. निवेदन देते प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजे. एन. टी. शहर अध्यक्ष राहुल राठोड, सागर राठोड, पंकज जाधव, पवन पवार यांचे सह रा. काॅं. चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदरचे निवेदन नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले यांनी स्विकारले.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



