श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.
पाचोरा – दि.12 जानेवारी रोजी श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात संगीत शिक्षक .रुपेश पाटील सर यांनी ईशस्तवनाने केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पी. एम. वाघ होत्या. प्रसिद्ध वक्ते .सचिन देवरे सर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. सुरुवातीला व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी मुख्याध्यापिका सौ. पी.एम. वाघ मॅडम यांनी व्याख्याते .सचिन देवरे यांचे शॉल व बुके देऊन स्वागत केले.
ज्येष्ठ शिक्षक.महेश कौंडिण् यांनी गोष्टी स्वरूपात स्वामी विवेकानंद यांचे विचार विद्यार्थ्यांच्या समोर मांडले .व्याख्याते सचिन देवरे यांनी आपल्या ओघवत्या व विनोदी शैलीतून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची शिकवण आजच्या विद्यार्थ्यांना कशाप्रकारे प्रेरणादायी ठरेल याविषयी मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणातून सौ.पी.एम वाघ मॅडम यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची शिकवण विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी असे आवाहन केले. सकाळ सत्रात सुद्धा हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयोजित वकृत्व स्पर्धेत सकाळ व दुपार सत्रातील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
याप्रसंगी शाळेचे उप मुख्याध्यापक . एन. आर. पाटील ,पर्यवेक्षक . आर. एल.पाटील सर,. ए.बी.अहिरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर.बी. तडवी,आर. बी. बोरसे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन .उज्वल पाटील यांनी तर आभार प्रदर्शन . एम.आर. पाटील यांनी केले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377