पाचोऱ्यात याऊद्दींन खाटिक यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी महापुरुषांच्या पुतळ्यास माल्यार्पण
पाचोरा – श्री.याऊद्दिन खाटिक सर,सहाय्यक आयुक्त, राज्य गुप्तचर विभाग मुंबई यांची जन्म भुमी जळगाव कर्मभुमी पाचोरा असून ते पाचोरा येथे सर्व समाज बांधवांच्या भेटीगाठी घेण्यासाठी आलेले होते त्याच प्रमाणे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून याऊद्दींन खाटिक सरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज,राष्ट्रपिता क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या स्मारक पुतळ्यांना माल्यार्पणाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच याऊद्दींन खाटिक सरांचे स्वागत सत्काराचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यात प्रमुख उपस्थिती समता परीषदेचे जिल्हा संघटक शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली, जागृती विद्यालयाचे मुख्याध्यापक राजु सावंत सर,संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल मराठे, संभाजी ब्रिगेडचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,महेंद्र नवगिरे सर, अरविंद जगताप सर, बागुल सर, प्रदीप जाधव सर, शेलार भाऊसाहेब,सुनिल महाजन, सर्व माळी समाज बहुजन समाज बांधव उपस्थित होते, कार्यक्रमाचे आयोजक पाचोरा माळी समाज उन्नती मंडळ पाचोरा जिल्हा जळगाव हे होत.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377