आपदा मित्र प्रशिक्षण कार्यशाळा
मा.जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव, श्री.अमन मित्तल यांचे आदेशानुसार जळगाव जिल्हा आपदा मित्र निवासी प्रशिक्षण कार्यशाळा क्रमांक 2 चे आयोजन क्रिडा संकुल क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे दिनांक 3 मार्च ते 14 मार्च 2023 दरम्यान करण्यात आले आहे .
निवासी उप जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राहुल पाटील, तहसीलदार श्री. जितेंद्र कुवर , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री.नरवीरसिंह रावळ, नाशिक येथील आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक तसेच 20 आपदा सखी व 190 आपदा मित्र सहभागी झाले.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राहुल पाटील यांनी सहभागीही आपदा मित्रांना मानव व नैसर्गिक आपत्ती काळात आपदा मित्र याची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. तसेच प्रतिनिधीक स्वरूपात महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त आपदा मित्र मार्गदर्शन पुस्तिका व आपदा किट चे वितरण करण्यात आले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377