पाचोरा-दिनांक 24 रोजी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी आजी-माजी आमदार व मार्केट कमिटीचे माजी सभापती रावसाहेब पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराविषयी आरोपांच्या फैरी झाडत,माहिती देत सदर बाबत प्रति आव्हान या नेत्यांना करीत खुलासा मागीतला होता.यावर माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन चांगलाच खरपूस समाचार घेत अमोल शिंदे बालिश पणाने आरोप करीत आहे असे स्पष्ट केले त्यांनी केलेल्या सर्व आरोपांची कागदपत्रांच्या आधारे महिती देत जेही कामे झाली त्यास पणन महासंघ व तत्सम सहकार विभागाच्या परवानगी असल्याचे सांगून माझ्या कार्यकाळात जागा विकली नसल्याचे त्यांनी सांगितले शिवाय प्रशासकीय काळात सुध्दा सर्व कामे कायदेशीर प्रक्रिया पार पाडून केले असून चुकीचे आढळल्यास राजकिय सन्यास घेईल परंतु अमोल शिंदे यांचे सारखे लबाड कोणी नसून मतदारांनी सावध पवित्रा घेत मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले
तसेच मा.पंडित शिंदे नगराध्यक्ष असताना काय काळे गोरे धंदे केले , लाखोंचा मलिदा घेतला? हे चांगलेच माहीत असून त्यांनी अनेक मुताऱ्यांचे काय केले हे सगळे ठाऊक आहे. पाचोऱ्यातील राठोड नामक फरसाण विक्री करणार व्यक्तीचे मुतारी ऐवजी गाळा बांधून विकला गेला तो नंतर का पूर्ववत मुतारीत बदलविला गेला असे अनेक गोष्टी त्यांचे वडील असताना झाल्या, जरी ते आमचे राजकिय विरोधक होते,संघर्ष होता तरी आरोप प्रत्यारोप करताना सामजिक व राजकिय भान जोपासले गेले पाहिजे प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न हे अशोभनिय असून ज्यांची घरे काचेची असतात त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगडे मारू नये थोडक्यात काय तर चिरागतले अंधेरा शिवाय जुम्मे के जुम्मे राजकारणात येणाऱ्यांनी भान राखले पाहिजे कारण आम्ही अनेक वर्षापासून राजकारणात असून देखील अशा प्रकारचे बेताल वक्तव्य व कुठल्याही आरोपांची शहानिशा केल्याशिवाय खोटे आरोप लावत नसतो आमदारांवर काय बोलावे हा त्यांचा वैयक्तिक भाग असून त्यांना उत्तरे आमदार देतील परंतु माझ्या संदर्भातील सर्व आरोपांचे कागदांनीशी पुरावे उपलब्ध असून सदर व्यक्तीने केलेल्या गोष्टी केविलवाण्या असून घरातीलच दोन सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याने सत्तेसाठी हे सर्व उठाठेव चालू असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे.म्हणून आधी स्वतःचे बघावे नंतर दुसऱ्यांना दोष द्यावा अशी टीका डागत या लबाड माणसा पासून मतदारांनी दूर राहत योग्य निर्णय घेऊन मतदान करण्याचे आवाहन केलं
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377