
पाचोरा,दि.30 – नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चुरशीची ठरत या निवडणुकीत महाविकास आघाडी विरोधात अपक्ष उमेदवार आहे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शुभांगी भास्कर पाटील या निवडणुकीच्या आखाड्यात असून पाचोरा शहर व तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शुभांगी ताई पाटील यांना निवडून आणण्या साठी कंबर कसली. आज दिनांक 30 रोजी पाचोरा शहराततील गो.से हायस्कूल बुथ वर महाविकास आघाडीचे पदाधिकारी शुभांगी पाटील यांना मतदान करण्यासाठी भारतीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पदाधिकारी सकाळपासून बुथवर बसलेले हीते ,सकाळपासून मतदान मागत होते. यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण जिल्हा पदाधिकारी अॅड अविनाश भालेराव ओबीसी तालुका अध्यक्ष इरफान मणियार सोशल मीडिया तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, राहुल शिंदे अमझद खान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेत्या वैशालीताई सुर्यवंशी, तालुका तालुकाप्रमुख शरद पाटील उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, अनिल सावंत, अभिषेक खंडेलवाल, भूपेशे सोमवंशी, अजय पाटील, पप्पू राजपूत, भरत खंडेलवाल क्षत्रिय ग्रुपचे धनराज पाटील, बाबाजी ठाकरे वैभव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे पी डी भोसले, विकास पाटील, अभिलाषा रोकडे, गोपी पाटील, अझर खान, संजय पाटील, धनंजय पाटील, प्रशांत नैनाव, आदी उपस्थितीत होते महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना मतदान करण्याचे आवाहान करीत होते
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



