
जळगाव, दि.१६ :– ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे २६ व २७ जून, २०२3 रोजी आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून सर्वसाधारणपणे १० वी व १२ वी ग्रॅज्युएट / आय.टी.आय सर्व ट्रेड पात्रतेची एकूण १७१ रिक्तपदे भरण्याविषयी कळविलेले आहे. या मेळाव्यात नमूद पात्रता धारण केलेल्या इच्छूक उमेदवारांनी सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना ॲप्लाय करण्यासाठी सेवायेजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग-ईन करुन ॲप्लाय करावा. तसेच ज्यांनी नोंदणी केलेली नाही. त्यांनी विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जाऊन नांव नोंदणी करावी व तद्नंतर आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉगीन करुन ॲप्लाय करावा. काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी ९.४५ ते स॔ध्या ६.१५) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता वि. जा. मुकणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



