
पाचोरा – दिनांक 24/06/2023 रोजी दुपारी 12वा.गुप्त बातमीच्या आधारे वनपरिक्षेत्र पाचोरा अंतर्गत परिमंडळ भडगांव, नियतक्षेत्र पळासखेडा मधील आमडदे गावाजवळील वनक्षेत्राच्या हद्दीत दोन वेगवेगळया घटनांमध्ये अवैध शिकारीच्या उद्देशाने वनक्षेत्रात फिरणारे एकुण 24 आरोपी व दोन पिकअप व्हॅन ताब्यात घेण्यात आले. पहिल्या घटनेत गुप्त माहीतीच्या आधारे वनविभागातील कर्मचारी श्री दुर्गादास वानखेडे वनरक्षक व श्री. मुकेश बोरसे वनरक्षक यांना वनविभागाच्या कक्ष क्रं. 366 मध्ये एक पिकअप व्हॅन क्रमांक MH 18 BG 4891 संदिग्ध अवस्थेत आढळुन आली. सदर व्हॅन ची तपासणी केली असता व्हॅन मध्ये दोन आरोपी, एक मृत रानडुक्कर व भाला, जाळी या प्रकारचे शिकाराचे साहित्य आढळुन आले.

सदर आरोपींना विचारपुस केली असता, त्यांनी त्यांचे इतर सहकारी जंगलात शिकारीसाठी गेले असलेबाबत सांगीतले. त्यानंतर वनपरिक्षेत्र पाचोरा अंतर्गत सर्व कर्मचारी / अधिकारी यांनी जंगल पिंजुन काढले परंतु इतर आरोपी आढळुन आले नाहीत. त्यानंतर परतीच्या वाटेवर असतांना एक बोलेरो पिकअप व्हॅन क्रमांक MH 13 R 8125 तळबंद तांडा ते आमडदे या रस्त्यावर संदिग्ध अवस्थेत आढळुन आली. सदर गाडीची तपासणी केली असता, सदर गाडीत 22 आरोपी आढळुन आले असुन त्यांच्या जवळ शिकारीसाठी लागणारे जाळी, भाला, कुऱ्हाड हे साहित्य आढळुन आले. सदर आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांच्या विरुद्ध वनगुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास म. उपवनसंरक्षक जळगांव श्री. व्ही. व्ही. होशींग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. एस. के. शिसव सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) जळगांव यांचे मार्फत करण्यात येत असुन वरील सर्व कार्यवाही श्री. ए. एस. मुलाणी वनपरिक्षेत्र अधिकारी पाचोरा, श्री. पी. बी देवरे वनपाल नांद्रा, श्री. एन. पी. पाटील वनपाल भडगांव, श्री दुर्गादास वानखेडे वनरक्षक पळासखेडा, श्रीमती. के. डी. पाटील वनरक्षक आमडदे, श्री. मुकेश बोरसे वनरक्षक आ.गि.त.प भडगांव, श्री. पी. व्हि. सुर्यवंशी वनरक्षक मालखेडा, श्रीमती. ए. दस. भोई वनरक्षक आ.गि.त.प पाचोरा, व इतर वन कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



