पाचोऱ्याच्या श्री समर्थ प्रोऍक्टिव्ह अबॅकस वेदिक मॅथ क्लासेसची समर नॅशनल रिजनल अबॅकस स्पर्धेत उत्त्तुंग भरारी
धुळे – येथे 24 जुन 2023 रोजी पार पडलेल्या प्रोऍक्टिव्ह अबॅकस समर नॅशनल रिजनल कॉम्पिटिशन (नॉर्थ झोन) 2023 या स्पर्धेमध्ये श्री समर्थ प्रोऍक्टिव्ह अबॅकस क्लासेस पाचोरा चे 26 विद्यार्थी विभागातून ट्रॉफीचे मानकरी ठरले. 6 मिनिटांत 100 गणिते सोडविणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते. या स्पर्धेत-विभागातून लिटिल चॅम्प लेव्हलमधून वेदांत प्रकाश चौधरी या विद्यार्थ्याने विभागातून दुसरा क्रमांक मिळवला आहे. तसेच गुंजन कपिल राऊळ या विद्यार्थिनीने चौथा क्रमांक, कार्तिक नितिन वाणी पाचवा क्रमांक , श्लोक प्रशांत सांगडे पाचवा क्रमांक ,लोकेश राजेंद्र येवले पाचवा क्रमांक मिळवला आहे. तसेच पहिल्या लेव्हल मधून तेजोनिधी शिवाजी सावंत या विद्यार्थिनी विभागातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. विराज मंजित चंदन या विद्यार्थ्याने देखील विभागातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच अंश सचिन भोई चौथा क्रमांक, आयुष विरभान पाटील पाचवा क्रमांक, अनुश्री संदीप पाटील पाचवा क्रमांक पटकावला आहे. @ तसेच या कॉम्पिटिशन मध्ये श्री समर्थ प्रो ॲक्टिव्ह अबॅकस क्लासेस पाचोरा मधील 26 विद्यार्थ्यांमधून 14 विद्यार्थ्यांनी सहा मिनिटात 70 गुणांपेक्षा अधिक गुण मिळविले त्यामुळे त्यांनादेखील बेस्ट परफॉर्मन्स ची ट्रॉफी देण्यात आली त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत .नीलराज सचिन पवार ,आर्यन अशोक बावचे, समीक्षा दीपक पाटील , देवांश मनोज पाटील, सुशांत जितेंद्र चौधरी, दिव्यांशू हरी चौधरी, सोहम दीपक पाटील, मनीष कन्हैया पाटील, आदित्य लक्ष्मण देवरे ,सृष्टी प्रवीण ब्राह्मने , शमिका सोनवने, तनस्वी रवींद्र पाटील, न्यानंद आबा सूर्यवंशी, स्वराज दिनेश तावडे, तनिष्का कपिल राऊळ हे विद्यार्थी विजेतेपदाचे मानकरी ठरले. नाशिक विभागात सर्वाधिक बक्षिसे श्री समर्थ प्रो ॲक्टिव्ह अबॅकस क्लासेस पाचोरा ला मिळाल्यामुळे क्लासच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल कंपनीकडून दहा हजार रुपयांचे बक्षीस केंद्र संचालक श्री रवींद्र पाटील सर आणि सपना शिंदे मॅडम यांना देण्यात आले. सदर स्पर्धेत नाशिक विभागातील 25 Abacus centre मधील 550 स्पर्धकांनी भाग घेतला होता.
सदर कार्यक्रमास श्री राजेंद्र लोचानी, श्री गिरीष करडे स्नेहा लोचानी ,श्री अजय मणियार,सारिका करडे, तेजस्विनी सावंत ,डायरेक्टर प्रोऍक्टिव्ह अबॅकस मुंबई हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना श्री समर्थ प्रोऍक्टिव्ह अबॅकसचे मास्टर ट्रेनर श्री रविंद्र पाटील सर आणि श्रीमती सपना शिंदे मॅडम यांचे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377