
जळगाव, दि. १४ जुलै – दस्तऐवज नोंदणी करतांना दस्त निष्पादीत करुन देणारा व घेणारा सर्व पक्षकारांनी त्यांचे कार्यान्वीत असलेले भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी दस्तांवर टाकावे म्हणजेच त्यावरुन पक्षकाराला आपल्या दस्ताची स्थितीची माहिती मोबाईल वरुन मिळणार आहे. तसेच ई-मेल वर दस्ताची सॉफ्ट कॉपी उपलब्ध होते. सदर दस्ताची कॉपी ई-मेल असल्यामुळे भविष्यात सुलभ संदर्भासाठी लगेच दस्ताची प्रत आपल्याला मिळते.
नागरिकांनी दस्त नोंदणी करतांना नोंदणी व मुद्रांक विभागाने उपलब्ध करुन दिलेल्या ‘आय-सरीती’ प्रणालीमध्ये आपले मोबाईल क्रमांक, ई-मेल आय. डी. तसेच पत्ते समाविष्ट करावे ते अचूक असल्याची खात्री करावी. असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी सुनिल पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



