सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय व सौ. ज. ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय तर्फे प्रभात फेरीतून मतदार नोंदणी जनजागृती
भडगाव – ता.भडगाव येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालय व सौ जयश्री गणेश पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय तर्फे मतदार जनजागृती करणेसाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. यावेळी संपूर्ण शहरातून विध्यार्थ्याची रैली काढून घोषणा देण्यात आल्या.
प्रभात फेरीच्या समारोप प्रसंगी भडगाव चे तहसीलदार साहेब श्री. मुकेश हिवाळे यांनी मतदानाचे व लोकशाहीतील मतदारांचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी प्राचार्य/ मुख्याध्यापक विश्वासराव साळूंखे, उपमुख्याध्यापक के. एस. पाटील, उपप्राचार्य संदीप सोनवणे, प्रा. प्रशांत पाटील, मुकेश पाटील, विजय केदार व विद्यार्थी उपस्थित होते .
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377