12 सप्टेंबर रोजी ‘शासन आपल्या दारी’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह, उप.मु देवेंद्र फडणवीस,अजित दादा उपस्थिती राहणार
पाचोरा, दि.11- महाराष्ट्र शासनाचा सर्वात यशस्वी होत असलेला प्रयोग जो जिल्हा स्तरावर होत असतो प्रथमच पाचोरा येथे होत आहे. आणि याची तयारी देखील जय्यत झाली असून चांगला प्रतिसाद मिळेल,शिवाय नियोजन शासनाच्या विविध सर्व योजनांचे लाभ घेता यावे व गतीमान शासन प्रगतीमान शासन असे सध्याचे सरकार चे काम आहे असे दिसून येत आहे
पाचोरा-भडगाव तालूकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमासाठी मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांचेसह या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत,पालकमंत्री गुलाबराव पाटील, ना.गिरीश महाजन, ना,. अनिल पाटील,ना.अब्दुल सत्तार, ना.दादा भुसे, ना.डॉ तानाजी सावंत यांच्यासह संपुर्ण मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री यांची उपस्थिती लाभणार आहे.शासनाच्या लोककल्याणकारी योजना व व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा लाभ गरजू नागरिकांना मिळावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने राज्यभर ‘शासन आपल्या दारी’ या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा निहाय सुरू आहे. तालुकास्तरीय’ शासन आपल्या दारी’हा उपक्रमाचे नियोजन करण्यात आले असून जळगाव जिल्ह्यातील पहिला तालुकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम पाचोरा येथे होणार आहे.
मुख्यमंत्री यावेळी पाचोरा व भडगाव तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न सुरू असलेल्या नगरदेवळा येथील औद्योगिक वसाहत, पाचोरा येथील उपजिल्हा रुग्णालय, क्रीडा संकुल,ऑक्सिजन पार्क या सह विविध विकास कामांचे देखील भूमीपूजन व उद्घाटन करणार आहेत. व तालुक्यातील सुमारे पंधरा हजार लाभार्थ्यांना विविध शासनाच्या योजनांचा लाभ देण्याचे नियोजन प्रशासन स्तरावर केले असुन याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह आ.किशोर अप्पा पाटील व प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी या पूर्वीच सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नियोजन केले आहे.
येथील कार्यक्रमा नंतर नांद्रा ता. पाचोरातील नर्मदा ऍग्रोचे मुख्यमंत्री उद्घाटन करणार आहेत.त्यांचे सोबत मंत्रिमंडळातील सदस्य देखील असल्याची.माहिती मिलाळी आहे
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377