जिल्हाधिकारी कार्यालयात ६ नोव्हेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन
जळगाव, दि. 31ऑक्टोबर – प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, ६ नोव्हेंबर, १०२३ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असेल आणि सदर अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळाले नसेल, अशाच वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377