डॉ. सुवर्णा पाटील यांचे अमळनेर येथे 97वेअखिल भारतीय साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते सत्कार व पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न
भडगाव येथील डॉक्टर सुवर्णा पाटील यांनी नुकतेच काढलेले अभिनव कथा प्रकाशन साहित्य संपदा या पुस्तकाचे उत्कृष्ट लेखन लिहिल्याबद्दल अमळनेर येथे 97 अखिल भारतीय साहित्य संमेलन येथे त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पाचोरा :- (अनिलआबा.येवले) – भडगाव येथील अभिनव संस्था व डी एम एल टी शिक्षण संस्था सांभाळून तसेच आपला वैद्यकीय व्यवसाय करून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या डॉक्टर सुवर्णा पाटील यांनी अनेक लेख व पुस्तके लिहिलेले असून. त्या एक अत्यंत हुशार व्यक्तिम्त्व असून त्यांनी वैद्यकीय व्यवसायात खेडोपाडी शिबिरे घेऊन गोरगरिबांना मदत केलेली आहे. तसेच बचत गटामार्फत त्यांनी महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे.
डॉक्टर सुवर्णा पाटील या एक सामाजिक कार्यकर्ता असून भडगावात त्यांची एक वेगळी प्रतिमा निर्माण झालेली आहे.त्यांनी नुकतेच अभिनव कथा म्हणून पुस्तक प्रकाशित केले. प्रकाशन साहित्यसंपदा. त्या पुस्तकात त्यांनी तरुण पिढी ऑनलाइन गेम मोबाईलवर कसे आहारी गेले आहे याचे उदाहरण दिलेले असून ऑनलाइन गेम मुळे अनेकांचे जीवन उध्वस्त झालेले असून अनेकांनी आपले जीव गमावले आहे असे अनेक उदाहरण त्या पुस्तकात लिहिलेले आहे
सध्याच्या सत्य परिस्थिती लिहिलेले पुस्तक आहे.
त्या पुस्तकाचे अमळनेर येथे अखिल भारतीय साहित्य संमेलनात प्रकाशन करण्यात आले, त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मान्यवरांमध्ये अहिराणी लेखक श्रीकृष्ण पाटील, शिव व्याख्याते श्री सदाशिव सूर्यवंशी सर, गजल कार श्री कुणाल पवार सर, कवी श्री बी एम चौधरीसर, श्री नामदेव कोळी सर, श्री नारायण दीपचंद पाटील, सौ चित्रा नारायण पवार, श्री जगदीश नारायण पवार असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377