
पाचोरा – शहरातील जय किरण प्रभाजी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या तर्फे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व अँड सुभाषचंद स्वरुपचंद संघवी यांचे स्मरणार्थ दरवर्षी मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबीराचे आयोजन करण्यात येते यावर्षी त्यांच्या 13 व्या स्मृती दिना निमित्त यावर्षीही दि ०६/०२/२०२३ सोमवार राजी सकाळी 10 वाजे पासून नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन जयकिरण प्रभाजी पतसंस्थेच्या कार्यालयात आयोजित केले आहे
संस्थेने प्रत्येक वर्षी 200 च्या जवळपास गरजू लोकांचे डाळ्याचे यशस्वी ऑपरेशन स्वखर्चाने केलेले आहे. सदरचे तपासणी शिबीर व रुग्णाचे डोळ्याचे ऑपरेशन जळगाव येथील नेत्ररोग तज्ञ व सुप्रसिद्ध डाॅ विकास बोरोले (नेत्रम हॉस्पिटल जळगाव ) यांच्या सहकार्याने संपन्न होणार आहे
अशा सेवाभावी मोफत नेत्र तपासणी व मोफत होणारे मोतिबिंदू ऑप्रेरेशनमुळे गोरगरिब व गरजू लोंकाचा लाभ होत आहे.
यावर्षी देखील दि 6 फेब्रूवारी 2023 सोमवार रोजी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त गरजूनी या संधीचा फ़ायदा घ्यावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



