
पाचोरा – आज दि १५ सप्टे. रोजी पाचोरा शहरात विविध ठिकाणी कोरोना लसीकरन मोहिम शिवसेना ,युवासेना,महिला आघाडी तर्फे राबविण्यात आली यावेळी सदर लसीकरना साठी प्रचंड गर्दी बघावयास मिळाली शहरातील शिवतीर्थ सभागृह चिंतामणी कॉलनी,गणपति मंदिर- कृषि कॉलनी ,राजीव गाँधी सोसायटी सभागृह,आशीर्वाद ड्रीमसिटी,झुलेलाल मंदिर सिन्धी कॉलनी ,संघवी कॉलनी या परिसरातील नागरिकांनी लसीकरनाचा लाभ घेतला

शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या शिबीरासाठी अचूक नियोजन केल्याचे दिसून आले आलेल्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांचे नाव ऑनलाईन नोंदणी करुण देणे व कोविड १९ लसीचा पहिला व दुसरा डोस मिळने पर्यंत नोंदी करणे हे सर्व काम बूथ वरील उपस्थित सहकारी यांनी बघितले याला तितकीच तत्पर साथ ही आरोग्य विभागातील महिला कर्मचारी व सह्कर्यांनी दिली त्यांचे ही काम कौतुकास्पद आहेच

सदर शिबीरात साधारण ६,५००पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरन झाल्याचे आयोजकांन कडून सांगण्यात आले.
या शिबीराचे वैशिष्ट म्हणजे लोकांन कडून स्वयमस्फुर्तीने प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले शिवाय नागरिकांच्या मदतीसाठीईतर उपस्थित तरुण मंडळीने सहकार्य केले. या ठिकाणी उपस्थित नागरिकांन कडून प्रतिक्रिया जानुण घेतले असता कोविड लसीचा पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी प्रचंड अडचणींना सामोरे जावा लागत होते परंतु शहरात विविध ठिकाणी जे कोविड लसीकरन कँप घेण्यात आले त्यामुळे नागरिकांची ससेहोलपट थांबुन रहिवासी क्षेत्रात हा लाभ मिळाल्याने नागरिक आनंदित होते व आयोजकांचे कौतुक करीत आभार प्रकट करीत होते तसेच पुढील टप्यात उर्वरीत भागातील लसीकरन केले जाणार असल्याचे समजते
सदर कोविड लसीकरन करून घेणे हे नागरिकांचे हितावह बाब असल्याने आमदार किशोरअप्पा पाटील यांनी प्रशासनास अवगत करुन शिवसेने तर्फे ही कोविड१९ महालसीकारण मोहीम राबविली.युवा सेनेचे सुमित किशोरअप्पा पाटील,आदित्य बिल्दिकर हे शिबिर स्थळी भेट देत होते या वेळी युवकांन कडून त्यांचे स्वागत होताना दिसले.सदर उपक्रमासाठी माजी उपनराध्यक्ष नपा- गणेश पाटील ,किशोर बारवकर शहर प्रमुख, माजी उपजिल्हा प्रमुख ऍड दिनकर देवरे,पप्पू राजपुत, बापू हटकर,प्रवीन ब्राम्हने ,नगरसेवक राम केसवानी,नगरसेवक शीतल सोमवंशी, गजेंद्र पाटील, योगेश पाथरवट, सागर पाटील, अनिल राजपूत, नितीन चौधरी , शिवसेना-युवासेना कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले.

बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



