आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

“विजयी झंझावात युवाशक्तीचा,आभार मतदार राजाच्या मतरूपी विश्वासाचा ” युवा सेनेच्या महाराष्ट्रभर आभार दौरा

जळगांव – अलीकडे पार पाडलेल्या विधानसभा निवडणूक 2024अंतर्गत शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रमुख नेतृत्वात तसेच कार्यसम्राट खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच युवा नेते युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक , युवासेना मुख्यसचिव राहुल लोंढे, सचिव किरण साळी आदी प्रमुख नेत्यांच्या अथक नियोजनबद्ध समाजसेवारुपी कार्याअंतर्गत शिवसेनेने तब्बल ६० जागी आपले आमदार निवडून आणले. तसेच प्रामुख्याने युवासेनेच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्र विभागामधून (धुळे,नंदुरबार,जळगाव )आदी विधानसभा मतदार संघातून तब्बल 14 पैकी 14 आमदार निवडून आणून आपले एक हाती निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. शिवसेना पक्षाच्या सदर अभूतपूर्व यशात युवासेनेचा महत्वपूर्ण प्रमुख सहभाग आहे.

त्याच अनुषंगाने युवासेनेचा ‘युवा विजय महाराष्ट्र दौरा’ येत्या १० फेब्रुवारी २०२५ पासून महाराष्ट्र राज्य भर आयोजित केला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आदी विधानसभा मतदारसंघातील मतदारांकडून शिवसेना पक्ष तसेच सर्वोच्च नेतृत्व ना. एकनाथ शिंदे यांच्या अफाट समाजसेवारुपी कार्यावर केलेल्या अभूतपूर्व मतदानरुपी आशीर्वादा अंतर्गत मतदार राजाचे आभार प्रकट करावे तसेच आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्यसंस्थांनच्या निवडणुकीअंतर्गत युवासेनेची अंतर्गत बांधणी अधिक भक्कमपणे व्हावी तसेच जनसामान्याशी जनसंपर्क अभियाना अंतर्गत नाळ जोडून पक्षाची दिशा, ध्येय धोरणे जनमाणसात घराघरात पोहचावी याच प्रमुख उद्देशातून युवासेनेतर्फे राज्यव्यापी आभार दौऱ्याचे नियोजन करण्यात आले असून उत्तर महाराष्ट्र विभाग ब अंतर्गत धुळे,नंदुरबार,जळगाव आदी मतदारसंघा अंतर्गत 10फेब्रुवारी ते 13फेब्रुवारी (पहिला टप्पा )
23फेब्रुवारी ते 26फेब्रुवारी (दुसरा टप्पा )13मार्च ते 16मार्च (तिसरा टप्पा )26मार्च ते 30मार्च (चौथा टप्पा ) अशा तब्बल चारटप्प्या अंतर्गत युवासेनेच्या माध्यमातून राज्यव्यापी आभार दौरा आयोजित करण्यात येणार असून सदर दौऱ्याअंतर्गत उत्तर महाराष्ट्र सचिव अविष्कार भुसे, युवासेना राज्य कार्यकारणी सदस्य प्रथमेश पाटील , किशोर भोसले, निखिल चौधरी, डॉ प्रियंका पाटील, योगिता ठाकरे,श्वेता सुयोग आदी युवासेना सदस्य सदस्य सहभागी होणार आहेत. “घरोघरी शिवसैनिक” आणि “गाव तिथे शाखा” यांची अंमलबजावणी करणे.प्रत्येक जिल्ह्यात कॉलेज व विद्यापीठ कक्षाची स्थापना करणे, सोशल मीडिया सेल ची स्थापना करणे, युवासेना संघटन मजबूत करण्याकरिता प्रत्येक तालुकानिहाय प्रमुख वक्ता तयार करणे, आरोग्य शिबीरे,रक्तदान शिबीरे, विविध शाळा तसेच कॉलेजला भेटी देत करिअर काउन्सिलिंग,शिक्षण साहित्यवाटप कार्यक्रम राबवणे असे व इतर अनेक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. युवासेना पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत पक्षाची संघटनात्मक बांधणीवर जोर देण्यात येणार आहे.अशी.माहिती पूर्वेश प्रताप सरनाईक युवासेना कार्याध्यक्ष यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!