पाचोरा- दि 28 रोजी पाचोरा येथील एस.एस.एम.एम. महाविद्यालय येथे छात्रभारती विद्यार्थी संघटनेची सभासद नोंदणी पार पडली. या सभासद नोंदणी ला पदवीधर विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विद्यापीठाने प्रवेश घेतानाच प्रवेश शुल्क सोबतच परीक्षा शुल्क देखिल घेतले जात आहे त्यामुळे परीक्षेला हजर नसणारे किंवा काही अडचणींमुळे परिक्षा न देऊ शकणारे यांच्याकडून अगोदरच शुल्क घेतल्यामुळे ते शुल्क परत करण्यासाठी विद्यापीठाकडे कुठलाही पर्याय नाही.यामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक ही होत आहे.पाचोरा तालुका मधून बरेच गरीब विद्यार्थी येत असतात त्यात कमवा शिका ही योजना यात जास्तच जास्त विद्यार्थी याचा कोटा विद्यापीठाने वाढवावा अशा इ. अनेक प्रश्नांवर विद्यार्थ्याची चर्चा झाली.
यावर छात्रभारती विद्यार्थी संघटना अशा मुद्द्यावर निवेदन देऊन अंदोलन करेल. आणी विद्यार्थ्याच्या हितावह मुद्यावर काम करेल.या वेळी छात्रभारती विदयार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदिप जाधव. उपाध्यक्ष ज्योती पाटिल. तालुकाध्यक्ष भूषण पाटिल. चंचल सोनवणे. राहुल पाटिल उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377