आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय भवन येथे 22 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची लॉटरी सोडत

जळगाव दि. 21 – मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी रविवार २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर, महाबळ रोड जळगाव येथे लॉटरी (ड्रॉ), निरीक्षकांच्या उपस्थितीत इन कॅमेरा होणार असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी दिली. महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना भारतातील तीर्थ क्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” सुरू करण्यात आली आहे. या योजनेतील पात्र व्यक्तींच्या प्रवासाचा, राहण्याचा व भोजनाचा खर्च शासना मार्फत करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील इच्छूक जेष्ठ नागरिकांना अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तीर्थ दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव यांच्याकडे प्राप्त असून, प्रत्येक जिल्ह्यासाठी शासनाने कोटा निश्चित केला आहे. कोट्या पेक्षा जास्त अर्ज आल्यास लॉटरीव्दारे प्रवाशांची निवड केली जाईल. शिवाय अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी केली जाईल. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी दि. २२/०९/२०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर, महाबळ रोड जळगाव येथे लॉटरी सोडत निरीक्षकांच्या उपस्थितीत इन कॅमेरा होणार आहे. असे सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी सांगितले.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!