पिंपळगाव हरेश्वर येथे नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या प्रचारार्थ डॉ. पूनमताई पाटील यांचा झंझावात.
नानासाहेबांना विजयासाठी दिले आश्वासन
पाचोरा – पिंपळगाव हरेश्वर येथे सर्वच राजकीय पक्ष आपली शक्ती पणाला लावत असतात. त्याचं कारणही तसेच आहे. या गावाचे सुमारे मतदान ११००० पर्यंत आहे. या गावात आज दिनांक ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या प्रचारार्थ डॉ. पूनमताई प्रशांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराची सुरुवात विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाने करण्यात आली. नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या प्रचाराचा झंजावात बघावयास मिळाला. यावेळी त्यांचे समवेत स्थानिक कार्यकर्ते किशोर भाऊ गरुड यांच्यासह गणेश गायकवाड, प्रकाश चव्हाण, बी आर महाजन, अरुण पाटील, प्रशांत पाटील, सुभाष गरुड, जयदत्त क्षीरसागर, भारत पाटणकर संजू गुंजाळ, कैलास गुंजाळ, स्वराज्य पक्षाचे भडगाव तालुका अध्यक्ष प्रतीक पाटील इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रचार रॅलीने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी संपूर्ण गावातून प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती या प्रचार रॅलीतून दिसून आली. गल्लोगल्ली उस्फूर्त असा प्रतिसाद मतदारांचा दिसून आला. प्रसंगी नानासाहेब प्रताप हरी पाटील यांची निशाणी सप्तकिरणांची पेनाची निप या चिन्हाचा प्रचार व प्रसार घरोघरी जाऊन बाजार चौक, माळे गल्ली, गुजर गल्ली, चव्हाण वाडा ,यमुना नगर, गोविंद मंदिर चौक, शंकरपुरा, विठ्ठलपुरा, इंदिरानगर, बेलदार वाडी, अरुण नगर, सब स्टेशन परिसर या ठिकाणी संपूर्ण गावात करण्यात आला. यावेळी डॉ. पूनमताई पाटील यांचे घरोघरी औक्षण करण्यात आले. श्री गोविंद महाराजांची विधिवत पूजा डॉ. पूनमताई पाटील यांच्या शुभहस्ते करून प्रचाराचा समारोप करण्यात आला. यावेळी स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते चंद्रकांत ठाकरे यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची ध्येय धोरणे व भूमिका काय याबाबत विस्तृत अशी माहिती उपस्थित पत्रकारांना नानासाहेब प्रताप हरी पाटील यांचे उमेदवारी व त्यांना का निवडून द्यावे त्यांची राजकीय पार्श्वभूमी दीपक भोसले यांनी मांडली. गावातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसून आला.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377