त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून पाचोरा पोलिसांना निवेदन

पाचोरा – त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर झालेल्या भीषण हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणी सर्व आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. राहुल पवार यांना देण्यात आले.
दि. २० सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या झी २४ तास चे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्ही चे ब्युरो चीफ अभिजीत सोनवणे व पुढारी न्यूज चे ब्युरो चीफ किरण ताजणे यांच्यावर स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंग परिसरात काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक व लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात पुढारी न्यूज चे पत्रकार किरण ताजणे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पत्रकारांवर होत असलेले हल्ले ही लोकशाहीला काळीमा फासणारी व देशाच्या चौथ्या स्तंभावर घाला घालणारी बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. समाजातील अन्याय, भ्रष्टाचार व जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनाने ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचेही संघटनेने स्पष्ट केले.हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी.
राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी धोरण आखावे.
हे निवेदन देताना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये राज्य प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा, शहर अध्यक्ष (इलेक्ट्रॉनिक मीडिया) कुंदन बेलदार, शहर अध्यक्ष छोटू सोनवणे, तालुका उपाध्यक्ष गौतम सोनवणे, सदस्य गौतम साळवे, विभागीय उपाध्यक्ष राकेश सुतार, शहर उपाध्यक्ष अन्वर शेख, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अबरार मिर्झा, तालुका अध्यक्ष स्वप्निल कुमावत दिलीप जैन सुरेश तांबे आदींचा समावेश होता.
पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त करत राज्य शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



